Janhvi Kapoor BF Shikhar Pahariya gives befitting reply to troller for casteist remark
शिखर पहारियाला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. मुख्यमंत्र्यांचा नातू म्हणून अवघ्या इंडस्ट्रीमध्ये फेमस असलेल्या शिखरने गेल्या काही दिवसांपूर्वी ‘स्काय फोर्स’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत गेल्या अनेक वर्षांपासून डेटिंगच्या चर्चा सुरु आहेत. जान्हवीने अनेकदा शिखरसोबत सोशल मीडियावर फोटोही शेअर केले आहेत. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या शिखरला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. शिखर पहारियाच्या एका पोस्टवर ट्रोलरने जातीयवादी कमेंट केली. या ट्रोलरला शिखरने चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
समाजातील वास्तव रुपेरी पडद्यावर येणार, ‘नयन’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज
दरम्यान, शिखर पहारियाने दिवाळीनिमित्त इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्याने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याच्याबरोबर जान्हवी कपूर देखील होती. शिखरसोबत त्याच्या सर्वच फोटोंमध्ये त्याचे पाळीव श्वानही आहेत. हे फोटो पोस्ट करून शिखरने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अभिनेत्याच्या त्या पोस्टवर एका तरुणीने ‘पण तू तर दलित आहेस.’ अशी कमेंट केली होती. शिखरने ती पोस्ट आणि त्यावरील ती कमेंट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.
तब्बल चार ते पाच महिन्यांनंतर शिखरने या कमेंटचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत ट्रोलरला प्रत्युत्तर देत म्हणाला की, “२०२५ मध्येही इतक्या तुमच्यासारख्या संकुचित आणि नीच विचारसरणीचे लोकं आहेत. दिवाळी हा सण प्रकाश, विकास आणि एकात्मतेचा आहे. पण हे सगळं तुमच्या बुद्धीच्या समजण्याच्या पलीकडले आहे. विविधतेत एकता आणि सर्वसमावेशक वृत्ती ही भारताची कायमच ताकद राहिली आहे. पण हे समजण्याएवढी बुद्धी तुमच्याकडे नाही. वाईट विचार पसरवण्याऐवजी तुम्ही स्वत:लाच शिक्षित केलं पाहिजे. कारण सध्या तुमचे विचार ही एकच गोष्ट अस्पृश्य आहे.”
janhvi kapoor boyfriend shikhar pahariya slams troller for calling him dalit says only untouchable thing is your level of thinking
“ते पेटवतील, आपण संयम ठेवायचा…” नागपूर हिंसाचारावर मराठमोळ्या अभिनेत्याची खरमरीत पोस्ट…
जातीवरून ट्रोल करणाऱ्या या ट्रोलरला शिखरने सडेतोड उत्तर दिलं आहे. शिखरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिखर पहारिया हा संजय आणि स्मृती पहारिया यांचा मोठा मुलगा आहे. शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याची आई स्मृती पहारिया या सुशीलकुमार शिंदे यांच्या थोरल्या कन्या होय. खासदार प्रणिती शिंदे या शिखरच्या मावशी आहेत. तर शिखर पहारिया आणि वीर पहारिया हे दोघेही भाऊ आहेत. दोघेही अभिनेते आहेत. दरम्यान, शिखरने नुकतेच महिला दिनानिमित्त आई स्मृती, आजी उज्वला शिंदे आणि गर्लफ्रेंड जान्हवी कपूरसाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. त्याच्या ह्या इन्स्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला होता.