हास्यजत्रा (hasyajatra) फेम प्राजक्ता माळी (prajkata mali) अर्थात तमाम तरूणांची हार्ट थ्रोब मराठीमधील आघाडीची अभिनेत्री… अभिनयाबरोबरच प्राजक्ताला फिटनेसचं प्रचंड वेड आहे. बिझी शेड्युलमधूनही ती तिच्या फिटनेसकडे पुरेपुर लक्ष देते. तिचे व्यायाम करतानाचे अनेक व्हिडीओ देखील ती इन्स्टाग्राम शेअरही करत असते. आजच्या जागतिक योग दिनाचं औचित्य साधून तिने एक नवा विक्रम रचला आहे. प्राजूने एकाच वेळी 108 सुर्यनमस्कार करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे….(international yoga day) (suryanamaskar)
योग,प्राणायम,व्यायामाबरोबरच प्राजक्ता उत्तम कवियत्री देखील आहे. प्राजक्ताची हास्यजत्रेच्या सेटवर फरसाण खाण्यावरून नेहमीच खिल्ली उडवली जाते. मात्र, तिने फरसाण खाल्लं तरी ती व्यायाम करून फॅट बर्न करायला विसरत नाही हेही तितकचं खरं….कारण, प्राजक्ताच्या दिवसाची सुरूवातच व्यायामाने होते. प्राजक्ताच्या व्यायामामध्ये सुर्यनमस्कारचाही समावेश असतो. आजच्या जागतिक योग दिनानिमित्त एक चांगला उपक्रम तिने हाती घेतला. तिने एकाचवेळी 108 सुर्यनमस्कार घातले.
सकाळी 7 वाजता तिने इन्स्टाग्रामवरून लाईव्ह व्हिडिओ केला. यावेळी व्यायाम करताना प्राजक्ताने कशी काळजी घ्यावी हे तर सांगितलचं, पण एसी बंद ठेवून व्यायाम करा अशी खास टीप दिली. 108 सुर्यनमस्कार केले याचा व्हिडीओच्या माध्यमातून पुरावा देत असल्याचं प्राजक्ताने सांगितलं.