(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ 5 डिसेंबरला रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी त्याने जवळपास डझनभर रेकॉर्ड बनवले आहेत. ‘पुष्पा 2’ हा केवळ देशातच नव्हे तर जगभरातील सर्वात मोठी ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. 2021 मध्ये ‘पुष्पा: द राइज’ने बॉक्स ऑफिसवरही अनेक विक्रम केले आणि आता ‘पुष्पा 2’ ने एक नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी देशभरात 168.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर प्रीमियर शोसह ही कमाई 178.40 कोटी रुपये आहे.
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २’ चा ४ डिसेंबर रोजी नाईट प्रिव्ह्यू झाला आणि त्यातही विक्रम झाला. नाईट प्रिव्ह्यूजमधून 10.1 कोटी रुपयांची कमाईही जोडली तर ‘पुष्पा 2’चे कलेक्शन 178.40 कोटी रुपये झाले आहे. ‘पुष्पा 2’ ची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती आणि आता रिलीज झाल्यानंतर त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता तो बंपर ब्लॉकबस्टर ठरेल असे म्हणता येईल. चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये आहे. (फोटो सौजन्य – Instagram)
तिसऱ्या दिवशीही तुफान खेळी
‘पुष्पा 2’ ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. निर्मात्यांनी त्याच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नव्हती. पुष्पा 2 बॉक्स ऑफिसच्या तिसऱ्या दिवशी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये वाढ झाली असून 40% लोकांनी तिकीटं खरेदी केली आहेत आणि यातून 14.95 लाख इतकी रक्कम मिळाली असल्याचे आता सांगण्यात येत आहे.
शनिवारी तिकीटविक्रीत वाढ
पुष्पा 2 चा ताप संपूर्ण देशभरात पसरला आहे आणि अभूतपूर्व सुरुवातीच्या दिवसानंतर, चित्रपटाने दुस-या दिवशी घसरण पाहिली होती. परंतु आज शनिवार असल्याने तिसऱ्या दिवसाच्या आगाऊ बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटी+ स्कोअर लोड होत असल्या असल्याचे आता समोर आले आहे.
रेकॉर्डब्रेक कमाई
तिकिटांची विक्री ‘पुष्पा 2’ ने सुरुवातीच्या दिवशीच कोणते रेकॉर्ड केले याबाबत आपण अधिक माहिती घेऊ
‘पुष्पा 2’ च्या रिलीज दरम्यान अल्लू अर्जुन का झाला भावूक? मुलगा अयानशी संबंधित हे प्रकरण!