सध्या अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेलं गोळीबार प्रकरण (salman khan house firing case) चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणी आता आरोपींना अटकही करण्यात आली आहे. पण या घडलेल्या घटनेबाबात बॅालिवूडमध्ये अजूनही चितेंच वातावरण आहे. अनेक सेलेब्रिटिंनी सलमान विषयी चिंता व्यक्त केली होती. नुकंतच बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतनही (Rakhi Sawant) सलमान खानविषयी चिंता व्यक्त करत त्याच्याविषयी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना विंनती केली आहे.
[read_also content=”वडिल इरफान खानच्या आठवणीत भावूक झाला बाबील, फोटो शेअर म्हणाला ‘मी कधीही हार मानणार नाही’ https://www.navarashtra.com/movies/actor-babil-khan-pens-down-a-heartfelt-note-for-irrfan-khan-he-promising-nev-527981.html”]
सध्या राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती भाईजान बद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहे. राखी म्हणाली की, “मी हात जोडून सलमान भाईला सांगेन की, त्यानं कधीही ईद आणि वाढदिवसाच्या दिवशी बाल्कनीत येऊन उभे राहू नये. तुम्ही चाहत्यांना भेटण्यासाठी एखादे मोठं हॉटेल बुक करू शकता, जिथे कडक सुरक्षा असेल.” पुढं तिनं म्हटलं, “कोहिनूर हिऱ्यापेक्षा सलमान खान आपल्या देशासाठी महत्त्वाचा आहे. सलमान खानचे संरक्षण करणे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. तो गरिबांचा मसीहा आहे. त्याला झेड, वाय, एक्स, या सर्व वर्गातील सुरक्षा द्याला पाहिजे.”
पुढं बोलतान कंगना म्हणाली की, “कंगना राणौतला इतकी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तिच्या मागे कोणीच लागलं नाही, तरीही तिला विनाकारण सुरक्षा दिली आहे. सलमान खानला खूप सुरक्षा देण्याची गरज आहे, असं मला वाटते. तो बॉलीवूडचा एक दिग्गज आहे.” त्यामुळे सलमानला सुरक्षा पुरवण्याची विनंतीही तिने यावेळी केली. राखीनं या पुर्वीही एका व्हिडिओ पोस्ट करत द्वारे सलमान विषयीची चिंता व्यक्त केली होती. तेव्हासुद्धा तिने भाईजानचं कौतुक केलं होतं.