बिहारचे ७० हजार कोटी कुठे गायब झाले...? चंपारणमधून प्रियांका गांधींचा पंतप्रधानांवर टिकास्त्र
काल पूर्व चंपारणमधील मोतिहारी येथे एका निवडणूक सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी बिहारच्या महिलांचे या योजनेकडे लक्ष वेधत राज्य सरकारची ही योजना केवळ निवडणूक जिंकण्याची चाल असल्याची टिका केली आहे. ” निवडणुका येत आहेत हे खरे आहे. आता पाहा कशा कशा घोषणा होतील. काल परवा बिहारमधील महिलांना १० हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. मग गेल्या वीस वर्षांत तुमचीच सत्ता होती मगा आजच जाग का आली, वीस वर्षांत कधीही महिलांनी १० हजार रुपयांची घोषणा केली नाही. मग आजच का देत आहेत. तुमच्य मतांसाठी देत आहेत. निवडणुका संपुद्यात ही योजनाही संपून जाईल. आता एक काम करा, ते १० हजार रुपये देत असतील तर घ्या, पण तुमचं मतदान देशासाठी करा. या धरतीसाठी, तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा. असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
प्रियांका गांधी म्हणाल्या, खूप झालं यांचं आता, संघर्ष तुम्ही करणार, पण तुम्हाला काहीच मिळत नाही. आपल्या समजुतीने सर्व पक्षांना ओळखायला शिका. मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला सांगते. काँग्रेसने महाआघाडीने असं ठरवलं आहे की, आम्ही तुम्हाला दरमहिन्याला २५०० रुपये देणार. पण माझ्याकडून हे काम नाही झालं तर मला शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही ती दिली पाहिजे. मग तुम्हीच ठरवा, यांनी किती खोटी आश्वासने दिली. शेतकऱ्यांपासून महिलांपर्यंत किती खोटी वचने दिली, मग यांना आता धडा शिकवा, यांची नियत तुम्हाला कळली पाहिजे.
माझा भाऊ आहे म्हणून बोलत नाही पण माझा भाऊ खरा देशभक्त आहे. म्हणून तो ४ हजार किलोमीटर पर्यंत चालू शकतो. गरीब आणि उपेक्षितांच्या वेदना फक्त तेच समजण्यासाठी ते आज प्रत्येक भागात जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. उद्या जर जर काँग्रेस सरकार स्थापन झाले तर गरीबांसाठी उपक्षितांसाठी आम्हाला काय योजना आखता येऊ शकतात. यासाठी ते आज प्रत्येकाला भेटत आहेत. काँग्रेस सरकार आले तर “माई बहन सन्मान योजने” अंतर्गत २ लाख रुपयांची आर्थिक मदत, विधवा, वृद्ध आणि अपंगांना २५०० रुपयांची मासिक पेन्शन आणि सरकारी विभागांमधील रिक्त पदे भरून बेरोजगारी दूर करतील. असही प्रियांका गांधींनी यावेळी स्पष्ट केलं.
राज्य सरकारकडून जनतेसाठी दिवाळी भेट; ऑक्टोबरमध्ये वीज बिलांमध्ये कपात तर गॅस सिलेंडरही मिळणार मोफत
खरे देशभक्त चोरी करून सत्तेत येत नाहीत. खरे देशभक्त जनतेला खोटी आश्वासने देत नाहीत. खरे देशभक्त फक्त निवडणुकांसाठी, मतदानासाठी जनतेशी संपर्क करत नाहीत. तर नियत समजा, राहुलजी सामाजिक न्यायासाठी लढत आहेत. अतिउपेक्षित, शेतकरी, महिलांसाठी लढत आहेत. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले, मग ते महात्मा गांधीजी असोत, वा आमच्या कुटुंबातील पूर्वज असोत, किंवा तुमच्या कुटुंबातील पूर्वजांनी बलिदान दिलेले असोत, ते बलिदान यासाठी दिले होते. न्यायासाठी ही बलिदाने दिली गेली आहेत.
म्हणून काँग्रेस पक्ष तुमच्यााठी काम करत आहे. निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. मोठमोठ्या गप्पा मारण सोपं आहे. पण खरं काम करणं खूप अवघड आहे. काँग्रेस पक्षाने तुम्हाला हे काम करून दाखवलं आहे. काँग्रेस सत्तेत असताना बिहारमध्ये किती पूल बांधले गेले. पण तुम्हीच सांगा गेल्या तीन वर्षात किती पूल पडले. २७ पूल पडले ३ वर्षात.
पंतप्रधान मोदीजी येतात. तुमच्यासमोर विकासाचे पॅकेज खोलतात, पण तुमच्याकडून एक पूल होऊ शकत नाही, तर तुम्ही विकासपुरूष कसे झालात. असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काम करणारा, आणि विकास करणारा कोण आहे आणि मोठमोठी आश्वासने देणारा कोण आहे. बिहारचे ७०,००० हजार कोटीं गायब झाले. CAG चा रिपोर्ट आला, मग हे पैसे कुठे गेले, ते पैसे तुमच्या योजनांसाठीचे पैसे होते. दलित, मागासवर्गांतील लोकांसाठी योजनांचे पैसे होते. पण हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचलच नाहीत. दहा वर्षात हे काहीच करू शकले नाहीत. अशी टिकाही प्रियांका गांधींनी यावेळी केली.






