अशनीर ग्रोव्हरचा पुन्हा सलमानशी पंगा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ब्लॉकबस्टर टीव्ही शो “बिग बॉस १९” मध्ये गेले एक महिना रोज काही ना काहीतरी घडत आहे आणि आता लवकरच वाईल्ड कार्ड एन्ट्री येणार अशीदेखील चर्चा आहे . “बिग बॉस १९” मधील स्पर्धक दररोज खळबळ उडवताना दिसतात. शाहबाज बदेशाने पहिल्यांदा वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश केला होता, तर आता “शार्क टँक इंडिया” आणि “राईज अँड फॉल” स्टार अश्नीर ग्रोव्हरचे नाव देखील “बिग बॉस १९” साठी सुचवण्यात आले आहे. निर्मात्यांनी “बिग बॉस १९” साठी अश्नीर ग्रोव्हरशी संपर्क साधला आहे, त्यांना वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश मिळावा अशी आशा आहे. तथापि, ग्रोव्हरने देखील या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
ग्रोव्हरने चक्क ई-मेल केला शेअर
अशनीर ग्रोव्हरचा स्वतःचा ‘राईज अँड फॉल’ नावाचा शो सध्या गाजतोय. याआधीदेखील अशनीर आणि सलमान एकमेकांसमोर आले आहेत. मात्र सलमानबाबत अश्नीरने अनेक वेळा वाईट बोलले आहे.
अश्नीर ग्रोव्हरने “बिग बॉस १९” च्या निर्मात्यांकडून त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरील ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याला “वाइल्ड कार्ड स्पर्धक” म्हणून शोमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. “बिग बॉस १९” चे कास्टिंग डायरेक्टर रोहित गुप्ता यांनी अश्नीर ग्रोव्हर यांना लिहिलेल्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने, सोशल मीडियावरील उपस्थितीने आणि शैलीने कास्टिंग टीमचे लक्ष वेधले आहे आणि ते “बिग बॉस १९” साठी एक मजबूत उमेदवार असू शकतात. ईमेलमध्ये असेही म्हटले आहे की ते “बिग बॉस १९” मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आपला प्रवास सुरू करू शकतात आणि शोमध्ये नवीन ऊर्जा भरू शकतात.
Bigg Boss 19 : या आठवड्यात होणार दोन स्पर्धकाचा पत्ता कट! डबल एविक्शनमध्ये कोणाचा लागणार नंबर?
सलमानबाबर अश्नीर काय बोलला
“बिग बॉस १९” च्या या ऑफरवर प्रतिक्रिया देताना, अश्नीर ग्रोव्हर यांनी लिहिले, “सलमान भाईंना विचारा. तोपर्यंत मी मोकळा होईन. या ‘मेल मर्ज’मुळे एखाद्याची नोकरी जाईल.” हे लक्षात घेण्यासारखे आहे की अश्नीर ग्रोव्हर “बिग बॉस १८” मध्ये पाहुणे म्हणून दिसला होता. तथापि, सलमान खानने त्यांच्याविरुद्धच्या विधानांबद्दल त्यांना स्टेजवर फटकारले. शिवाय, अश्नीर ग्रोव्हर सध्या एमएक्स प्लेअरवरील “राइज अँड फॉल” या शोमध्ये दिसत आहे. या शोला प्रेक्षकांकडूनही खूप प्रेम मिळत आहे. या शो मध्ये देखील अशनीर ग्रोव्हरने एकदा सलमान खानच्या शो बाबत आणि सलमानबाबत टिप्पणी केली होती, नाव न घेता त्याने आपल्या शो मधून बिग बॉस शो बाबत चुकीची वक्तव्यं केली होती.