फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला पत्थ्य विसरून मर्यादेच्या बाहेर व्यायाम करणे चांगलेच महागात पडले आहे.गेल्या आठवड्या भरापासून रकुल बेड रेस्टवर आहे. जिममध्ये व्यायाम करता असताना ८० किलोग्रॅम इतक्या वजनाचे डेडलिफ्ट मारल्यामुळे रकुलच्या पाठीला दुखापत झाली आहे. या दुखापतीमध्ये तिने काही काळासाठी आपल्या बिघडत्या आरोग्याला दुर्लक्ष केले आणि होणार त्रास आणखीन वाढत गेला. अखेर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला काळी कालांतरासाठी बेड रेस्ट करावयास सांगितले गेले आहे. महत्वाची बाब म्हणजे., रकुलच्या आरोग्यामध्ये सुधार होत असल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे.
हे देखील वाचा : चीनमधील रहस्यमय गाव! जिथे सगळेच लोक ठेंगणे; लोकांची उंची 3 फुटांपेक्षा कमी
५ ऑक्टोबर २०२४ रोजी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह व्यायामशाळेत व्यायाम करत असताना तिला दुखापत झाली आहे. ८० किलोग्रॅम इतक्या वजनाचा डेडलीफ्ट मारत असताना तिने बेल्टचा वापर केला नाही. परिणामी, तिच्या पाठीवर अतिजोर आल्यामुळे ही घटना घडली आहे. गेल्या आठवडाभरापासून रकुल आराम करत आहे. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
दुखापतीतही केले शूटिंग
जिममध्ये झालेल्या या दुखापतीला सहन करत रकुलने ‘दे दे प्यार दे २’ ची शूटिंगला जाण्यास पसंती दिली. आराम न केल्यामुळे तोच त्रास वाढला. परिणामी, तिला बेड रेस्ट घ्यावी लागली. सलग तीन दिवस शूटिंग केल्यानंतर त्रास वाढल्यामुळे तिने डॉक्टरकडे जाणायचा निर्णय घेतला. तिच्या मते, दर तीन ते चार तासाने तिच्या पाठ दुखीच्या त्रासात वाढ होत होती. दुखापत झाल्यामुळे L4, L5 आणि S1 नसे जाम झाली होती. त्यामुळे तिला औषधांबरोबर इंजेक्शनही देण्यात आली होती. सुंत्रानुसार, तिच्या परिस्थितीत आता सुधार होण्यास सुरुवात झाली आहे.
हे देखील वाचा : ऐश्वर्या रायचा आहे नणंद श्वेताशी 36 चा आकडा, नणंद-भावजयीमध्ये का होतात भांडणं, 6 मोठी कारणं
अभिनेत्रीने २००९ मध्ये गिल्ली या कन्नड सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेला यारियां चित्रपटातून अभिनेत्रीने हिंदी सिनेसृष्टीत डेब्यूट केला. तिचा ऐलान तिचे ‘Ayalaan’ तसेच ‘इंडियन 2’ या तामिळ भाषेतील चित्रपटातील पात्र फार गाजले होते. तिच्या ‘दे दे प्यार दे 2’ या आगामी चित्रपटात ती अभिनेता अजय देवगणसह दिसून येणार आहे.