फोटो सौजन्य: सोशल मीडिया
गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन समय रैनाचा स्टँड-अप कॉमेडी शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये आक्षेपार्ह विधान केल्यामुळे युट्यूबर रणवीर अलाहाबादिया कमालीचा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, समय रैना यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रणवीर अलाहाबादियाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. त्या प्रकरणावरून रणवीरने माफी देखील मागितली. मात्र, आता रणवीर अलाहाबादियाला महाराष्ट्र सायबर सेलने २४ फेब्रुवारीला हजर राहण्यासाठी समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.
Chhaava Movie: “छावा” चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? युवासेनेकडून एकनाथ शिंदे यांना निवेदन
‘इंडियाज गॉट लेटेंट’या कार्यक्रमात यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याने तो वादात सापडला आहे. त्याने त्या वेब शोमध्ये स्पर्धकासोबत पालक आणि लैंगिक संबंधांबद्दल वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादिया आणि शोमध्ये उपस्थित असलेल्या इतरांविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास एजन्सींकडून करण्यात येत आहे. त्यावेळी शोमध्ये रणवीर अलाहाबादियासह कार्यक्रमाचा होस्ट समय रैना, आशीष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा माखिजा उपस्थित होते.
रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील अनेकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत.हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वेबशोचा होस्ट आणि युट्युबर समय रैना परदेशात असल्याने त्याने आपली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, आता त्याची ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागाने फेटाळली आहे. तसेच १८ फेब्रुवारीपर्यंत वैयक्तिकरित्या उपस्थित राहून जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र सायबर सेलने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’शोमध्ये आतापर्यंतच्या सर्व एपिसोड्समध्ये सहभागी झालेल्या सर्व उपस्थितांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. सायबर सेलने आता ४२ जणांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. चौकशीसाठी ज्यांना बोलावण्यात आले आहे त्यात कलाकार, निर्माते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र सायबर सेलचे इन्स्पेक्टर जनरल यशस्वी यादव यांनी सोमवारी सांगितले की, सायबर सेलने शोसंबंधित सर्व ४२ लोकांना समन्स पाठवले आहेत.
माध्यमाला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी सांगितले की, “अधिकाऱ्यांनी तपासात सहभागी असलेले सर्व व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तपास सुरू असताना त्यांना शोचे खाते बंद करावे लागणार आहे. सायबर अधिकाऱ्यांनी सुरुवातीला वादग्रस्त भाग काढून टाकयला सांगितले होते. परंतु नंतर, रैनाला या प्रकरणासंबंधित सर्व व्हिडिओ काढून टाकण्यास सांगण्यात आले. प्रथमदर्शनी या प्रकरणात समय रैना, अपूर्व मखीजा आणि रणवीर अलाहाबादिया हे आरोपी आहेत. देवेश दीक्षित, रघु राम आणि आणखी एका व्यक्तीचे जबाब आधीच नोंदवण्यात आले आहेत.”
Chhaava Movie: ‘हमारी सबसे बडी कमाई…’, थिएटरमधील छोट्या मुलाने दिलेली गर्जना ऐकून विकी भावुक
महाराष्ट्र सायबर सेलने १८ फेब्रुवारी रोजी समय रैनाला चौकशीसाठी बोलावले होते. सध्या तो भारताबाहेर असल्याने, त्याने सायबर सेलला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीत सहभागी होण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. परंतु सायबर सेलने वेळेबाबतचे हे अपील फेटाळून लावले आणि म्हटले की त्याला त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे.