मुंबई : बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याच्या बहुचर्चित ‘वेड’ चित्रपटातील ‘सुख कळले’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात अभिनेत्री जिनिलिया डिसूझा देशमुख आणि रितेशची रोमँटिक केमेस्ट्री दिसत आहे. Desh Music या यू ट्यूब चॅनेलवर हे नवं गाणं प्रदर्शित करण्यात आले असून कमी कालावधीतच गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
‘वेड’ हा मराठी चित्रपट रितेश देशमुख यांचा पहिला दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे. या चित्रपटाचे म्युजिक प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय अतुल यांनी केले असून या चित्रपटातील ‘वेड लावलाय’, ‘वेड तुझा’ , ‘बेसुरी’ ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहेत. वेड’ चित्रपटातील ‘सुख कळले’ हे नवं गाणं प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने गायले आहे. ‘वेड’ चित्रपट ३० डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.