वयाच्या 39 व्या वर्षी आई होणार 'गोपी बहू', मॅटर्निटी शूटचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
साथ निभाना साथियामधील गोपी बहू फेम देवोलिना भट्टाचार्जी लवकरच आई होणार आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मॅटर्निटी शूटचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो प्रचंड व्हायरल झाले असून चाहत्यांनी देवोलिना भट्टाचार्जीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने गेल्या महिन्यातच तिच्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर आता तिने काही फोटो देखील शेअर केले आहेत. तिने लेटेस्ट मॅटर्निटी शूटसह तिचा गरोदरपणाचा अनुभव शेअर केला आहे.
हेदेखील वाचा- Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात नवी जोडी! चाहत पांडेने या हँडसम अभिनेत्याबद्दल दिली पसंतीची कबुली
2024 मध्ये अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली आणि पहिल्यांदाच आई होण्याचा अनुभव घेतला. नताशा दलाल, ऋचा चढ्ढा आणि दीपिका पदुकोण यांच्याशिवाय टीव्हीवरील अनेक सुंदरीही आई झाल्या आहेत. या यादीत टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीचेही नाव लवकरच सामील होणार आहे. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम)
शानवाज शेखसोबतच्या लग्नाच्या दोन वर्षानंतर देवोलिना भट्टाचार्जी आई होणार आहे. अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अनेक दिवसांपासून बातम्या सुरु होत्या, मात्र तिने यावर मौन पाळले होते. गेल्या महिन्यातच तिने एका पोस्टद्वारे ती आई होणार असल्याची घोषणा केली होती. आता ती लवकरच तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. प्रसूतीपूर्वी तिने मॅटर्निटी शूटचे फोटो शेअर केले आहेत.
देवोलीना भट्टाचार्जीने बेबी शॉवरनंतर मॅटर्निटी शूट केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मॅटर्निटी शूटचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, देवोलिना खुर्चीवर बसून तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. अभिनेत्रीने थाई स्लिट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे, जो फ्रिल गाउनसह जोडलेला आहे.
साथ निभाना साथिया फेम अभिनेत्री देवोलिनाने मोकळे केस आणि कमीत कमी मेकअपने आपला लूक साधा ठेवला आहे. तिच्या चेहऱ्यावरील गरोदरपणाची चमक तिचे सौंदर्य वाढवत आहे. या फोटोशूटवेळी अभिनेत्रीने हातात पांढऱ्या फुलांचा पुष्पगुच्छ घेतला आहे. हे फोटो शेअर करताना देवोलिना भट्टाचार्जीने प्रेग्नेंसीच्या टप्प्यातील अनुभव शेअर केला आहे. देवोलिनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “प्रत्येक किक मला आठवण करून देते की प्रेम येत आहे. प्रेग्नेंट मुमेंट.”
हेदेखील वाचा- Bigg Boss 18 : सलमान खान अविनाश मिश्राचा वकील? सोशल मीडियावर केलं ट्रोल
देवोलिना भट्टाचार्जीने 2022 मध्ये शानवाजसोबत कोर्ट मॅरेज केले होते. दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. शनवाजसोबत लग्न केल्यामुळे देवोलीनाचे कुटुंबीय तिच्यावर नाराज असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. तिचा भाऊ तिच्याशी अनेक महिने बोलतही नव्हता. मात्र, आता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे. 39 वर्षांची देवोलीना लवकरच तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे आणि नवीन आयुष्य सुरू करणार आहे.