दरम्यान, सैफ अली खानच्या आरोपीला तीन दिवसांनी ठाण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपीला न्यायलयात हजर करून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल असं पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी १६ जानेवारीच्या मध्यरात्री राहत्या घरी चाकूहल्ला करण्यात आला. हल्लेखोराने अभिनेत्यावर तब्बल ६ वार केले होते. यानंतर सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
अशातच सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर सैफ अली खानचं रुग्णालयातील बिलाची प्रत व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्याला डिस्चार्ज कधी देण्यात येईल याची तारीखही नमूद करण्यात आली आहे.
Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण; कोर्टाने आरोपीला सुनावली 5 दिवसांची कोठडी
व्हायरल झालेल्या विम्याच्या कागदपत्रात सैफकडून ३५ लाख ९८ हजार रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स क्लेम करण्यात आला आहे. त्यापैकी कंपनीने २५ लाख मंजूर केले आहेत. याबद्दल निवा हेल्थ इन्शुरन्सने, संपूर्ण उपचारानंतर अंतिम बिल सादर झाल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जाईल असं म्हटलं आहे. हेल्थ इन्शुरन्सच्या कागदपत्रांनुसार अभिनेत्याला डिस्चार्ज २१ जानेवारीला देण्यात येणार आहे. सैफच्या हेल्थ इन्शुरन्सच्या कागदपत्रांमध्ये त्याचा संपूर्ण हॉस्पिटलच्या उपचाराचा खर्च शिवाय त्याच्या संभाव्य डिस्चार्जची तारीखही उघड करण्यात आली आहे.
१५ शहरं, पोलिसांची ३५ पथकं; सैफवरील हल्लेखोराच्या ७२ तासात कशा आवळल्या मुसक्या?
निवा बुपा या हेल्थ इन्शुरन्स कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “अभिनेता सैफ अली खानबरोबर घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि अत्यंत चिंताजनक आहे. आम्ही त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी शुभेच्छा देत आहोत. ते रुग्णालयात ॲडमिट झाल्यापासून आम्हाला कॅशलेस प्री-ऑथोरायझेशनची रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती आणि उपचार सुरू करण्यासाठी आम्ही सुरुवातीच्या रकमेची मंजुरी दिली आहे. पूर्ण उपचारानंतर अंतिम बिल मिळाल्यानंतर, पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार उर्वरित रक्कम दिली जाईल.”
दरम्यान, सैफ अली खानच्या आरोपीला तीन दिवसांनी ठाण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपीला न्यायलयात हजर करून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल असं पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.