सौजन्य- सोशल मीडिया
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर जगभरात प्रचंड मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. त्याच्या अभिनयाची चर्चा फक्त देशातच नाही तर जगभरात होते. शाहरुख खानला बॉलिवूडचा किंग खान म्हणून संबोधलं जातं. सध्या बॉलिवूडचा किंग खान एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या चर्चेत येण्याचे प्रमुख कारण ठरलंय त्याची संपत्ती…. किंग खानने पहिल्यांदाच हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत स्वतःचं नाव नोंदवलं आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी शाहरुख खानकडे ७,३०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे शाहरुखची गेल्या वर्षभरात इतकी संपत्ती वाढली आहे. गेल्या वर्षी किंग खानचे जवळपास तीन चित्रपट एका पाठोपाठ एक रिलीज झाले आहेत. ‘पठान’ आणि ‘जवान’ ला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. पण ‘डंकी’ चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. किंग खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर, कोलकाता नाईट रायडर्स आणि रेड चिलीज एन्टरटेनमेंटमुळे शाहरुख खान श्रीमंतांच्या यादीत विराजमान झाला आहे. मुख्य बाब म्हणजे अभिनेता उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या सोबत श्रीमंतांच्या यादीत आहे.
India’s Biggest SUPERSTAR #SRK debuted on the Hurun India Rich list with a net worth of ₹7,300 crore in 2024🔥🔥🔥 @iamsrk pic.twitter.com/kvzte3x6pq
— CineHub (@Its_CineHub) August 29, 2024
मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या संपत्तीत चित्रपटांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आणि कोलकाता नाईट रायडर्सला मिळालेल्या विजयानंतर संपत्तीमध्ये घसघशीत वाढ झाली आहे. एका वर्षभरात शाहरूख खानच्या संपत्तीत एक हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आहेत. तर हुरून इंडिया रिच लिस्टमध्ये शाहरूख खान अव्वल ठरला आहे. फोर्ब्स २०२३च्या अहवालानुसार, शाहरूखची २०२३ मध्ये एकूण संपत्ती ६, ३०० होती. एका वर्षात शाहरूखच्या संपत्तीत एक हजार कोटींची वाढ झालीये.
हे देखील वाचा – प्रिया एटलीने “रेड नॉट” नावाचा नवीन अन् बोल्ड फॅशन ब्रँड केला लाँच!
अभिनेत्याच्या कमाईमध्ये वाढ जाहिरात आणि चित्रपटांच्या माध्यमातून होते. शिवाय, चित्रपटाच्या होणाऱ्या नफ्यामध्ये, शाहरूखचा मोठा वाटा असतो. शिवाय शाहरूख वर्षाला रेड चिलिज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातूनही कोट्यवधींची कमाई करतो. हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडरची को-ओनर आणि सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला आहे. जुही चावलाची संपत्ती ४,६०० कोटी इतकी आहे. जुही चावलानंतर अभिनेता हृतिक रोशनचा समावेश होतो. त्याकडे २००० कोटी रुपयांची संपत्ती आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब यादीत चौथ्या स्थानी आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाकडे १,६०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर पाचव्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती १४०० कोटी रुपयांची आहे.