Jawan Box Office: शाहरुख खानचा (Shahrukh khan) 2023 चा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘जवान’रिलीज (Jawan release) झाला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box office) धमाल केलेली आहे. ‘जवान’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ओपनिंग चित्रपटाचा विक्रमही (opening day collection) या चित्रपटाने केला आहे. ‘जवान’ने पहिल्याच दिवशी तुफान कमाई करत ‘पठाण’, ‘गदर 2’सह अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
‘जवान’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?
शाहरुख खानच्या ‘जवान’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बंपर कमाई करून इतिहास रचला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईत ‘पठाण’चा ओपनिंग डे रेकॉर्ड मोडला आहे. यासोबतच ‘जवान’ बॉलिवूडचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. आगाऊ बुकिंगच्या पहिल्या दिवसापासूनच कहर करणाऱ्या ‘जवान’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 75 कोटी रुपये कमावले आहेत. शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर सिनेमाने धमाकेदार ओपनिंग केले आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी हिंदी व्हर्जनमध्ये 63 ते 65 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. पठाण सिनेमाचाही रेकॉर्ड मोडला आहे.
‘जवान’ने मोडला ‘पठाण’चा रेकॉर्ड
शाहरुख खानने आपल्या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईत ‘पठाण’ सिनेमाला मागे टाकले आहे. पठाणने पहिल्या दिवशी हिंदीमध्ये 55 कोटी रुपयांची कमाई केली होती. जवानने हिंदीमध्ये पहिल्या दिवशी भारतात सुमारे 63 – 65 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या तीन चेन थिएटरमध्ये जवान सिनेमाने 31 कोटींची कमाई केली आहे, तर पठाणने या तीन चेन थिएटरमध्ये 27 कोटी कमावले होते. ‘जवान’ने हिंदी व्हर्जनमध्ये ‘पठाण’ पेक्षा 8 कोटींहून अधिक रुपयांची चांगली आघाडी घेतली आहे. ‘पठाण’ बुधवारी म्हणजेच कोणतीही सुट्टी नसताना तर ‘जवान’ जन्माष्टमीला रिलीज झाला आहे.
‘जवान’ स्टार कास्ट
एटली दिग्दर्शित या सिनेमात शाहरुख खानशिवाय नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. दीपिका पदुकोण आणि संजय दत्त यांचाही सिनेमात कॅमिओ आहे.