फोटो सौजन्य - Social Media
उद्या १४ नोव्हेंबर म्हणजेच चाचा नेहरू यांची जयंती! देशासाठी विशेष असणाऱ्या या विशेष माणसाच्या या विशेष दिनाला (Children’s Day) बाल दिवस म्हणून ओळखले जाते. या दिवशी तुम्ही तुमच्या बाळांना मनोरंजनाचा उत्तम डोस देऊ शकता. आपल्या पाल्याला लहान मुलांवर आधारित काही सिनेमे दाखवू शकता, जेणेकरून त्यांचा हा दिवस उत्तम जाईल. त्यात हे सिनेमे लहान मुलांना शिकण्यासाठी आहेत. प्रोत्साहित करणारे आहेत आणि जीवनाचे धडे देण्यात तरबेज आहेत. त्यातील हे सिनेमे तुम्ही आधीच पाहिले देखील असतील पण काही हरकत नाही मुलांसाठी पुन्हा एकदा पहा! कारण यात मसाला कमी आणि जीवनाचे धडे मोठे आहेत. तर कोणते सिनेमे? पहा.
तारे जमीन पर
तारे जमीन पर हा सिनेमा नेटफ्लिक्सवर हमखास मिळून जाईल. तुमचा मुलगा अभ्यासात जरी हुशार नसला तरी तो क्रीडा, कला अशा क्षेत्रात नक्कीच उत्तम असेल. एकंदरीत, अभ्यास येत नाही म्हणून खचलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना अंगीकृत असणाऱ्या कौशल्यांची ओळख करून देणारा आणि त्यात पुढे कसे जायचे? याची एकंदरीत जाणीव करून देणारा हा सिनेमा आपल्या पाल्याने पहिलेच पाहिजे.
चिल्लर पार्टी
स्वाभिमानाचा लढा कसा द्यावा? या गोष्टीवर आधारित उत्कृष्ट सिनेमा चिल्लर पार्टी तुमच्या मुलांनी नक्कीच पाहिले पाहिजे. हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला ‘Amzon Prime’ असणे गरजेचे आहे. त्यावर हा सिनेमा उपल्बध आहे.
दंगल
मुलीही कुस्ती खेळू शकतात. याचे उत्तर उदाहरण सांगणारे दंगल ही मुव्ही तुमच्या पाल्याला दाखवा. हा चित्रपट ‘Amzon Prime’ वर पाहू शकता.
सितारे जमीन पर
स्पेशल मुलांवर आधारित या सिनेमामध्ये त्यांना बास्केटबॉल खेळताना दाखवले आहे आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात कसे समाधानी राहावे याचे ऊतार उदाहरण या चित्रपटात दाखवले गेले आहे.
उद्या बाल दिवसानिमित्त हे सिनेमे नक्कीच पहा. यात मसाला कमी आणि संदेश जास्त आणि मोठे आहेत, जे बाल मनासाठी उपयुक्त आहेत.






