बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) ‘बिग बॉस १६’ द्वारे आपलं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. चार वर्षांनंतर तो पुन्हा इंडस्ट्रीत येण्याचा विचार करत असताना त्याच्या शोमध्ये जाण्याबाबत अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली होती. अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) साजिद खानविरोधात लैंगिक छळाचा आरोप करत पोलीस ठाण्यात (Police Complaint) तक्रार केली आहे. मात्र, गुन्हा दाखल झालेला नाही.
[read_also content=”‘हर हर महादेव’मध्ये महाराजांच्या मनातलं युद्ध – अभिजीत देशपांडे https://www.navarashtra.com/photos/writer-director-abhijeet-deshpande-interview-about-har-har-mahadev-interview-nrsr-337738.html”]
शर्लिन चोप्राने आज जुहू पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक छळाचा आरोप असलेल्या साजिद खानविरोधात तक्रार दाखल केली आहे. साजिद खानने ‘बिग बॉस १६’ मध्ये प्रवेश केल्यापासून शर्लिन चोप्रा या गोष्टीला विरोध करत होती. तिने पत्रकार परिषदेत याआधी साजिदबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या आणि साजिदचे सत्य तिला संपूर्ण जगाला सांगायचे आहे असे तिने सांगितले होते.
साजिद खान २०१८ सालापासून वादात सापडला आहे. दरम्यान, #MeToo मोहीम सुरू होती. अनेक अभिनेत्रींनी साजिद खानवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. अलीकडेच राणी चॅटर्जीनेही साजिदवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे साजिदला वर्षभर इंडस्ट्रीत काम न करण्याचे आदेश देण्यात आले होते. अलीकडेच साजिद ‘बिग बॉस १६’ मध्ये सहभागी झाला.