गेल्या काही दिवसांपासून कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या(Siddharth Malhotra) लग्नाची चर्चा सुरु आहे. हे दोघं 6 फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नाचे सगळे विधी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये (Suryagadh Palace) होणार आहेत. प्री- वेडिंग फंक्शन्स 4-5 फेब्रुवारीपासून सुरु होतील. (Siddharth Kiara Wedding)
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची बातमी ही सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. सिद्धार्थ कियारा आणि ज्या ठिकाणी ते दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत त्या जागेचा फोटो विरल भयानीनं शेअर केला आहे. हा फोटोसोबत विरल भयानीनं लिहिलं आहे की कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं लग्न कव्हर करण्यासाठी जैसलमेरला जात आहोत. 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान सूर्यगढ पॅलेसमध्ये ते दोघे सप्तपदी घेणार असल्याचा खुलासा विरल भयानीनं केला आहे.
4 फेब्रुवारीपासून प्री वेडिंग फंक्शन्स
मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नामध्ये साधारण 100-150 पाहुणे येणार आहेत. लग्नासाठी दोघांचे कुटुंबिय, जवळचे मित्र -मैत्रिणी आणि बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटी सामील होतील.सिद्धार्थ आणि कियारा यांच्या 4-5 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या फंक्शन्समध्ये हळदी, मेहंदी आणि संगीत सोहळा या तीन कार्यक्रमांका समावेश आहे. वेडिंग प्लॅनरनी सगळी लग्नाची तयारी केली आहे.
पॅलेसचं भाडं
सिद्धार्थ – कियारा जैसलमेरच्या ज्या सूर्य पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत ते पॅलेस डोंगरामध्ये वसलेले आहे. साधारण 4 एकर जागेत तयार करण्यात आलेल्या या पॅलेसमध्ये 90 खोल्या आहेत. या पॅलेसचं भाडं 12 हजार रुपयांपासून सुरु होतं आणि सुविधांनुसार हा दर वाढत जातो. लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी इथे एका दिवसाचं भाडं साधारण 1-2 कोटी रुपये आहे.हे हॉटेल एक आलिशान महालासारखं आहे. इथलं फर्निचर सागवान आणि चंदनाच्या लाकडापासून बनवलेलं आहे. इथे स्विमिंग पूल, जिम , बार अशा अनेक सुविधा आहेत.
ग्रँड रिसेप्शन
लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा मुंबईमध्ये ग्रँड रिसेप्शन ठेवणार आहेत. त्यासाठीचं प्लॅनिंग सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात शाहिद कपूर, मीरा कपूर, करण जोहर, मनीष मल्होत्रा, अश्विनी यार्डी, वरुण धवन, कॅटरीना कैफ, अक्षय कुमार असे अनेक सेलिब्रिटी, सिद्धार्थ कियाराचे नातेवाईक आणि मित्र परिवार या लग्नासाठी उपस्थित राहतील.