(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
राजेश चव्हाण दिग्दर्शित ही गूढ थ्रिलर सीरिज कोकणातील एका भयानक परिसरात घडते. हि कथा सानिका या तरुणीची आहे, जी कोकणातल्या एका प्राचीन वाड्यात दडलेल्या रहस्यांकडे ओढली जाते. या वाड्यात धर्मसेनाचा आत्मा वास करत असून, वाड्यातील गुप्त खजिन्याच्या मोहामुळे तो अजूनही मर्त्यांच्या जगात अडकलेला आहे. जसजसा भूतकाळ उलगडत जातो तसतसे कथेला एक वेगळे वळण येते. हे सगळं पाहायला प्रेक्षकांना मज्जा येणार आहे.
या सीरिजमध्ये सुहास जोशी एका सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे सानिया चौधरी, अभिनय सावंत, रोशन विचारे, कश्यप परुळेकर आणि नयन जाधव यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या वेब सिरीजच्या ट्रेलर लाँचवर प्रतिक्रिया देताना अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनेमेंटचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “‘खोताची वाडी – एक शापित वास्तु’ या सीरिजच्या निमित्ताने आम्ही एक गोष्ट एकाच वेळी विविध भाषिक प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत. आमच्यासाठी देखील हा एक वेगळा अनुभव असणार आहे. यातून आम्ही नक्कीच भाषेला प्राधान्य देणाऱ्या आणि पॅन-इंडियन ओटीटी इकोसिस्टीमच्या आमच्या व्हिजनला बळकटी देत आहोत.”
‘Border 2’ ला कोणत्याही कटशिवाय सेन्सॉर बोर्ड काढून हिरवा कंदील; जाणून घ्या चित्रपटाचा स्क्रिन टाईम
‘अल्ट्रा प्ले’ हिंदी प्रेक्षकांसाठी कंटेंट सादर करत असताना, अल्ट्रा झकास मराठी कंटेंटमधील आपले आघाडीचे स्थान अधिक बळकट करत आहे. या लाँचद्वारे अल्ट्रा मीडियाच्या वाढीचा पुढील टप्पा सुरू झाला आहे. शिवाय या टप्प्याला स्थानिक भाषांमधील ओरिजिनल कंटेंट, डिजिटल विस्तार आणि एकाच कथा विविध भाषांमध्ये सादर करणामुळे नवी चालना मिळाली आहे.






