(फोटो सौजन्य - x अकाउंट)
दरवर्षीप्रमाणे, यावेळीही भारतीय चित्रपट आणि कलाकारांची उपस्थिती कान्स २०२५ मध्ये दिसून येणार आहे. हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्रपट प्रेमींसाठी खास असणार आहे. कान्स २०२५ मंगळवारपासून सुरू झाला आहे, यावेळी जगाच्या या मोठ्या मंचावर कोणते भारतीय चित्रपट दिसणार आहेत हे जाणून घेण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणकोणते भारतीय चित्रपट दाखवण्यात येणार आहे. हे आपण जाणून घेणार आहोत.
Aranyer Din Ratri
शर्मिला टागोर आणि सौमित्र चॅटर्जी अभिनीत सत्यजित रे यांचा १९७० मध्ये आलेला ‘अरण्यार दिन रात्री’ हा चित्रपट यावेळी कान्समध्ये प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच, फिल्म हेरिटेज फाउंडेशनने माहिती दिली की या चित्रपटाची 4K आवृत्ती तयार करण्यात आली आहे जी आता कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवली जाणार आहे. द फिल्म फाउंडेशन, ल’इमॅजिन रिट्रोवाटा, फिल्म हेरिटेज फाउंडेशन, जानस फिल्म्स आणि द क्रायटेरियन कलेक्शन यांच्या सहकार्याने हा चित्रपट पुनर्संचयित करण्यात आला आहे. शर्मिला टागोर आणि सिमी गरेवाल देखील या स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत.
Amazon Prime Video आणखी महागणार, जाहिरातीच्या नावाखाली किंमत वाढवून चाहत्यांची फसवणूक!
Tanvi The Great
अनुपम खेर बऱ्याच काळानंतर तन्वी द ग्रेट या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात परतले आहेत, जो लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट १७ मे रोजी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे. अनुपम खेर आधीच कान्समध्ये पोहोचले आहेत आणि त्यांचा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात खाकी: द बिहार चॅप्टर फेम अभिनेता करण टॅकर देखील आहे. तसेच, बोमन इराणी, जॅकी श्रॉफ आणि अरविंद स्वामी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. गेम ऑफ थ्रोन्स अभिनेता इयान ग्लेन देखील या चित्रपटाचा एक भाग आहे.
Homebound
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांची मुख्य भूमिका असलेला नीरज घायवान यांचा ‘होमबाउंड’ हा चित्रपट ७८ व्या कान्स महोत्सवात दाखवला जाणार आहे. जगभरातील विविध आणि कलात्मक चित्रपटांचे प्रदर्शन करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘अन सर्टेन रिगार्ड’ विभागात या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. जान्हवी आणि ईशानचा हा पहिलाच कान्स चित्रपट असणार आहे. दोघांनीही ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही जोडी पाहायला मिळणार आहे.
Charak
चरक चित्रपटाचे दिग्दर्शन शीलादित्य मौलिक यांनी केले आहे. हा चित्रपट यावेळी कान्समध्ये दाखवला जाणार आहे. त्याची कथा बंगालच्या पारंपारिक चरक पूजेवर आधारित आहे आणि अंधश्रद्धेचा मुद्दा उपस्थित करणारी या चित्रपटाची कथा आहे.
‘Sitaare Zameen Par’ चा ट्रेलर पाहून रितेश देशमुख झाला भावुक, काय म्हणाला अभिनेता?
A Doll Made Up Of Clay
सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SRFTI) अंतर्गत बनवलेला ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ हा चित्रपट देखील कान्स २०२५ मध्ये दाखवला जाणार आहे. हा चित्रपट इथिओपियन विद्यार्थी कोकोबे गेब्रेहेवर्या टेस्फे यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. २३ मिनिटांच्या या चित्रपटला सिनेफा विभागात निवडला गेला आहे, ज्यामध्ये जगभरातील चित्रपट शाळेतील विद्यार्थ्यांना दाखवले जातात.
कान्स चित्रपट महोत्सव म्हणजे काय?
कान्स हा जगातील सर्वात मोठ्या आणि आदरणीय चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे जिथे सेलिब्रिटी, चित्रपट उद्योगातील लोक, विद्यार्थी आणि चित्रपट प्रेमी एकत्र येतात आणि चित्रपटाचा उत्सव साजरा करतात. गेल्या अनेक वर्षांपासून, हा महोत्सव ग्लॅमर, प्रतिष्ठा आणि उत्तम सिनेमाचे प्रतीक आहे. अनेक ऑस्कर विजेत्या चित्रपटांची सुरुवात येथून झाली आहे. गेल्या काही वर्षांत काही चित्रपट व्हेनिस, टोरंटो आणि टेलुराइड सारख्या महोत्सवांकडे वळू लागले होते, ज्यामुळे कान्सचा प्रभाव काहीसा कमी झाला होता, परंतु आता गेल्या तीन वर्षांत ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ट्रँगल ऑफ सॅडनेस आणि ॲनाटॉमी ऑफ अ फॉल सारखे पाम डी’ओर विजेते चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत होते. आता १३ ते २४ मे पर्यंत चालणारा हा महोत्सव यावेळी काय खास घेऊन येतो हे पाहणे बाकी आहे.