कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेला ‘बिग बॉस मराठी 4’ हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. बिग बॉस मराठी शो ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून आता या सो मध्ये पहिल्या वाईल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही बिग बॉस मराठी सीझन ४ ची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री असून रविवारी ती बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. तर या घरामधून योगेश जाधव हा सदस्य बाहेर पडला आहे.
बिग बॉस मराठीच्या रविवारच्या भागात घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी विकास सावंत आणि योगेश जाधव हे दोघे सदस्य डेंजर झोनमध्ये होते. ज्यामधून जनतेचा कौल न मिळाल्यामुळे योगेश जाधव घराबाहेर पडला. तर दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या पर्वातली पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. आता स्नेहलता वसईकरच्या येण्याने बिग बॉसच्या घरातील समीकरण किती बदलतील हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे. १४१
कोण आहे स्नेहलता वसईकर?
अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि सिनेमांत काम केलं असून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत स्नेहलता ही सोयरा बाईसाहेबांच्या भूमिकेत दिसून आली होती. या मालिकेमुळे स्नेहलता घराघरांत पोहोचली. तिची ही भूमिका चांगलीच गाजली. स्नेहलता वसईकर तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे अनेकदा चर्चेत असते. बोल्ड फोटोशूटमुळे नेटकरी तिला अनेकदा ट्रोल देखील करत असतात.