फोटो सौजन्य: YouTube
आज सिनेतारकांपासून ते अनेक क्षेत्रातल्या दिग्गजांपर्यंत, सर्वांची पाऊले आज मुंबई नगरीकडे वळत आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकूलनातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यास अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातील दिग्गज व्यक्तिमत्व सुद्धा या लग्नात दिसले आहे. यातीलच एक दिग्गज व्यक्तिवत्व म्हणजे WWE सुपरस्टार जॉन सीना.
हल्ली जॉन सीना खूप चर्चेत आहे हे ते त्याने नुकतेच जाहीर केलेल्या त्याच्या निवृत्तीमुळे. या निवृत्तीमुळे त्याच्या भारतातील चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. पण हाच धक्का अचानकपणे आनंदात बदलला तो जॉन सीनाच्या भारतात झालेल्या आगमनामुळे. या आगमनाचे कारण ठरले ते अंबानींच्या घरातील अनंत-राधिकाची लग्नसराई.
दिगज्जांची कुठलीही लग्नसराई असो, खऱ्या अर्थाने धमाल करतात ते आपले paparazzi. प्रत्येक स्टारला विशेष नावाने संबोधण्यात ते माहीर आहे आपल्याला सर्वांचा माहीती आहे. यंदा सुद्धा एकीकडे जॉन सीन अनंत-राधिकाच्या लग्नासाठी आला असताना paparazzi नी त्याचे स्वागत खास विशेषणांनी केले आहे. कधी जॉन काका तर कधी जॉन बाबू अशा अतरंगी नावाने त्यांनी जॉन सीनला हाक मारली आहे. या टोपनांवांना जॉन सिनाने देखील मज्जेत घेतले आहे.
जॉन सीना व्यतिरिक्त अन्य कलाकार सुद्धा मुंबईत दाखल झाले आहेत. यात प्रियांका- निकपासून ते अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती सुद्धा अनंत-राधिकाच्या लग्नात उपस्थित राहिले आहेत.