Sunny Deol vs Rajnikanth : 10 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या जेलर सिनेमाने (Jailer cinema) 10 दिवसांत जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. भारतात या सिनेमाने 245.9 कोटींची कमाई केली आहे, त्यापैकी केवळ दक्षिण पट्ट्यात या सिनेमाने 5 दिवसांत 134 कोटींची कमाई केली आहे. गदर 2 (Gadar 2) आणि ओएमजी 2 (OMG 2 ) हे दोन मोठे सिनेमाही 11 ऑगस्टला म्हणजे जेलरच्या रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी रिलीज झाले, परंतु या 2 सिनेमांचा फारसा परिणाम झाला नाही. माउथ पब्लिसिटी आणि क्रेझ असूनही, गदर 2 सध्या 433 कोटींच्या जगभरातील कलेक्शनसह रजनीकांतच्या जेलरपेक्षा मागे आहे.
दाक्षिणात्य सिनेमा आणि बॉलिवूड चित्रपटांच्या कमाईत दिसणाऱ्या तफावतीचे थेट कारण म्हणजे स्क्रीनकाउंट. स्क्रिनकाउंट म्हणजे रिलीज होण्यास मिळालेल्या स्क्रीनची संख्या किंवा चित्रपट रिलीज झालेल्या स्क्रीनची संख्या. 2023 मध्ये भारतात एकूण 10167 सिंगल स्क्रीन थिएटर्स आहेत, त्यापैकी फक्त दक्षिण बेल्टमध्ये 6320 सिंगल स्क्रीन आहेत.
जेव्हा प्रादेशिक भाषेतील सिनेमा दक्षिणेतील थिएटर्समध्ये दाखवला जातो, तेव्हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्याचा थेट परिणाम कलेक्शनवर होतो. दक्षिणेतील प्रेक्षक आणि थिएटरची संख्या पाहाता भारतातही पॅन इंडिया चित्रपटांचा ट्रेंड वाढत आहे. याशिवाय अधिक स्क्रीनटाइमचा फायदाही सिनेमाच्या कलेक्शनला होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट जगभरात 7000 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. त्याच वेळी, त्याचे बहुतेक शो दक्षिणेकडील थिएटर्समध्ये आहेत. ज्याचा थेट फायदा सिनेमाला होत आहे. जास्त स्क्रीन काउंट असण्याचा परिणाम म्हणजे या सिनेमाने पहिल्याच दिवशी जगभरात 72 कोटींचे कलेक्शन केले.
दक्षिणेतील 95 टक्के थिएटर फक्त जेलरसाठी बुक करण्यात आली आहेत
कमाईत हिंदी चित्रपटांपेक्षा दक्षिणेचे चित्रपट का पुढे आहेत याचे कारण म्हणजे दक्षिण पट्टा म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये इतर राज्यांपेक्षा सिंगल स्क्रीन थिएटर्सची संख्या जास्त आहे. 2023 मध्ये भारतात एकूण 10167 सिंगल स्क्रीन आहेत, परंतु यापैकी 6320 स्क्रीन फक्त दक्षिण भारतात आहेत, जिथे बहुतेक तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळममध्ये सिनेमा रिलीज होतात.
गर्दी आकर्षित करण्यासाठी दक्षिणेत तिकिटांचे दर कमी केले
दक्षिणेत सरकारने चित्रपटांच्या तिकीट दरांवर नियंत्रण ठेवले आहे. आजही बहुतेक सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये 100 रुपयांपेक्षा जास्त किंमतीची तिकिटे नाहीत. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकही अनेकदा चित्रपट पाहायला येतात.
चित्रपटगृहांचे मालक आणि चित्रपट कलाकार या दोघांनीही अनेकवेळा सरकारला सिनेमाचे तिकीट दर वाढवण्याची विनंती केली आहे, पण सरकारने तिकीट दर कधीच वाढवले नाहीत कारण दक्षिणेकडील राज्यांमध्ये सिनेमाचा मतदान करण्यासाठी राजकीय हत्यार म्हणूनही केला जातो.
फॅनक्लब आणि लोकप्रियतेचा प्रभाव साऊथच्या चित्रपटांवरही पडतो
स्टार्सचे फॅन क्लबही व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मदत करतात. एकट्या रजनीकांतचे 60 हजार फॅन क्लब आहेत. ते मोठ्या प्रमाणात तिकिटे बुक करतात. प्रत्येक स्टारचा स्वतःचा फॅन क्लब असतो. साऊथचे स्टार्सही एकमेकांच्या सिनेमांचे प्रमोशन करतात. काही चाहत्यांनी आरआरआर सिनेमा पाहण्यासाठी लॉस एंजेलिसचे संपूर्ण थिएटर बुक केले. त्याचवेळी दक्षिणेतही अशीच अनेक प्रकरणे पाहायला मिळाली. चित्रपटाची क्रेझ एवढी होती की आंध्र प्रदेशातील एका थिएटरला चाहत्यांपासून वाचवण्यासाठी स्क्रीनसमोर काटेरी तार लावण्यात आली होती. साऊथमध्ये चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शहरभर स्टार्सचे मोठे कटआउट्स लावले जातात. त्याचवेळी दुधाचा अभिषेक करून थिएटरबाहेर आनंदोत्सव साजरा केला जातो आणि म्हणूनच साउथचा सिनेमा बॉलिवूडपेक्षा वरचढ ठरतो.