बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या बॉलिवूड करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुष्मिता सेनसोबतचे नाते मान्य केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली. एवढेच नाही तर ते लवकरच लग्न करणार असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. मात्र आता त्यांचे ब्रेकअप झाले असून दोघांमध्ये कोणताही संबंध नसल्याची चर्चा आहे. ललित मोदींनी सोशल मीडियावर केलेल्या एका बदलामुळे या चर्चांना उधाण आले आहे.
ललित मोदी इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतात. ते दररोज वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतात. ललित मोदींनी त्यांचा इन्स्टाग्राम बायो बदलला आहे. यामध्ये त्याने सुष्मितासोबतचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम बायोमधूनही माहिती काढून टाकली आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी गडबड झाल्याचीही जोरदार चर्चा आहे.
ललित मोदी आधीच विवाहित आहेत. मात्र 2018 मध्ये त्यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला. ललित मोदी आणि मीनल यांचा विवाह 1991 मध्ये झाला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. आलिया मोदी आणि रुचीर मोदी अशी त्यांची नावे आहेत. रुचीर ललित मोदींसोबत लंडनमध्ये राहतात. ललित मोदी यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.






