बॉलीवूड स्टार तापसी पन्नूने शेवटी तिच्या आणि हँडसम बॅटमॅनटैन कोच मॅथियास बो या दोघांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. या वर्षी तापसी आणि मॅथियास यांनी फेब्रुवारी महिन्यात उदयपूर येथे लग्न करून एकमेकांच्या बंधनात अडकले गेले आहेत. या दोघांचे लग्न एकदम खासगी पद्धतीत झाले असून, हि बातमी कोणालाच लावू दिली नाही. याचबरोबर तापसीने आपल्या लग्नाचा फोटो किंवा व्हिडीओसुद्धा पोस्ट केलेला नाही. आता नुकत्याच झालेल्ल्या एका इंटरव्हीमध्ये तापसीने तिच्या लिव्ह स्टोरी बद्दल सांगितले आहे की, ती आणि मॅथियास कसे एकमेकांच्या प्रेमात पडले. (फोटो सौजन्य- Instagram)
तापसी पन्नूने तिचा पती मॅथियास सोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. तिने उघड केले की हे तिच्यासाठी ‘पहिल्या नजरेतील प्रेम’ नव्हते. तिने या नात्यात आपला वेळ घेतला कारण हे नाते दोघांसाठी किती चांगले काम करणार आहे हे पाहायचे होते. ती मॅथियासला तो पर्येंत भेटत राहिली की जो पर्येंत तिला वाटणार नाही की, शेवटी ती व्यक्ती सापडली जशी तिला आपल्या आयुष्यात हवी होती हे कळेपर्येंत ती त्याच्या सोबत राहिली.
देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंवर मी नेहमीच प्रभावित झाली आहे.
तापसी पन्नू म्हणाली, “मला असे वाटते की हे खरं आहे की तो एक ॲथलीट आहे आणि व्यक्ती आहे ज्याने सुरुवातीला ऑलिम्पिक जिंकले होते… माझे अर्धे काम तिथे झाले होते. मी नेहमीच अशा खेळाडूंनी प्रभावित झाली आहे जे आपल्या देशासाठी खेळतात आणि खूप दडपणाखाली असून सुद्धा प्रभावित खेळतात… निदान माझ्यासाठी हे पहिल्या दृष्टीक्षेपात प्रेमाची परिस्थिती नव्हती. ते प्रत्यक्षात व्यावहारिक आहे की नाही हे तपासण्यासाठी मला वेळ लागला… नातेसंबंध टिकून राहणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
[read_also content=”अली फजलसोबतच्या ‘इंटरफेथ’ लग्नाबद्दल रिचा चढ्ढाने सोडले मौन, म्हणाली- ‘तुम्ही तुमच्या आवडीवर ठाम असाल तर…’ https://www.navarashtra.com/photos/interfaith-marriage-with-ali-fazal-richa-chadha-said-if-you-are-firm-on-your-choice-543674.html”]
‘मी त्याच्या आधी अनेक मुलांना डेट केले होते आणि अचानक…’
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला ते आवडले आणि त्याचा मी आदर केला. आणि आम्ही भेटत राहिलो आणि मी त्याच्यावर प्रेम करू लागली. त्यामुळे प्रेमात पडणे हे काय एका महिन्यात किंवा लगेच झाले नाही. तथापि, ही एक वस्तुस्थिती आहे जी मी अनेकदा मुलाखतींमध्ये पुनरावृत्ती करते – जेव्हा मी त्यांना भेटली तेव्हा मला असे वाटले की मी एखाद्या माणसाला भेटली आहे. मी त्याच्या आधी अनेक मुलांना डेट केले होते आणि अचानक मला एक मुलगा भेटला, ज्याला भेटल्यानंतर मला समजले की मी अशा व्यक्तीला भेटीहली आहे ज्याला मी यापूर्वी कधीही भेटली नाही. त्यामुळे सुरक्षिततेची आणि परिपक्वतेची ही अचानक भावना होती, जी इतकी स्पष्ट होती की मला असे वाटले, ‘ठीक आहे, शेवटी तुम्हाला ती व्यक्ती सापडली आहे.’