'या' उत्कृष्ट लेखणीने तारक मेहता यांना दिली वेगळी ओळख, शेवटच्या श्वासापर्यंत घेतला होता मनोरंजनाचा वसा...
‘सब टिव्ही’वरील सर्वाधिक प्रसिद्ध मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’कडे पाहिलं जातं. ही मालिका गेल्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. ही मालिका फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचे लेखक तारक मेहता यांची आज जयंती आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त खास त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
तारक मेहता यांचा जन्म २६ डिसेंबर १९२९ रोजी गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये झाला. ते फक्त पेशाने लेखकच नाही तर, स्तंभलेखक, नाटककार आणि पटकथालेखकही होते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचं कथानक दस्तुर खुद्द तारक मेहता यांनी लिहिलेल्या ‘दुनिया ने उंधा चष्मा’ या कादंबरीतूनच घेण्यात आलेले आहे. मालिकेमुळे लेखक तारक मेहता बरेच प्रकाशझोतात आले होते. २०१५ या वर्षी त्यांना भारत सरकारचा सर्वात मानाचा समजला जाणाऱ्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. हा पुरस्कार भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देण्यात आला होता.
“एकोणवीस वर्ष झाली आमचा सांता जाऊन…”, प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याची वडिलांच्या आठवणीत भावूक पोस्ट
तारक मेहता यांची ओळख प्रेक्षकवर्गात वेगवेगळ्या माध्यमातील लिखाणाची असलेली विविधता आणि गुजराती नाट्य चळवळीसोबत जोडल्या गेलेल्या नाळेने त्यांना एक वेगळीच ओळख दिली. सोबतच त्यांना ‘तारकभाई’ या नावानेही चाहते ओळखायचे. तारक मेहता यांची ओळख प्रेक्षकांमध्ये आणि वाचकांमध्ये एक उत्कृष्ट साहित्यिक अशी अजूनही कायम आहे. ‘दुनियाने उंधा चष्मा’ १९६५, ‘तारक मेहताना आठ एकांकियो’ १९७८, ‘तारक मेहतानो टपुडो’ १९८२, ‘तारक मेहतानी टोकळी परदेसना प्रवासे’१९८५ या लोकप्रिय साहित्यांचा समावेश त्यांच्या उत्कृष्ट लेखणीत करता येईल.
नाताळनिमित्त अभिनेत्री कीर्ती शेट्टीचं खास फोटोशूट
तारक यांनी आपल्या दमदार लेखणीने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सर्व चाहत्यांना हसवण्याचा वसा हाती घेत त्यांनी सर्वांचेच मनोरंजन केले. ‘सोनी सब’वरील तारक मेहता यांच्या नावावरुन सुरु झालेली मालिका चाहत्यांना आजही त्याच जोशात हसवते. तारक यांच्या लेखणीबद्दल सांगायचे तर, त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून ‘वन लाइनर’च्या विनोदाने चाहत्यांना खळखळून हसवले आहे. अनेक विनोदी पुस्तकांचे लेखन तारक मेहता यांनी गुजराती भाषेत केले आहे. गुजराती नाट्य चळवळीतील योगदान कधीच न विसरण्यासारखे आहे.
“रंग माळीयेला…” कौमुदी वालोकरच्या हळदीतले पाहा सुंदर Photos!
मालिकेच्या लिखानासोबतच तारक यांनी आपल्या आयुष्यात तब्बल ८० पुस्तकं लिहीली आहेत. तारक यांनी १९७१ पासून ‘चित्रलेखा’ मासिकेसाठी लेखन सुरु केले होते. त्यापूर्वी तारक मेहता यांच्या खांद्यावर १९६० ते १९८६ या कालखंडात केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या फिल्म डिव्हिजनमध्ये अधिकारी म्हणून जबाबदारी होती. त्यासोबतच ‘नवूं आकाश नवी धरती’ आणि ‘कोथळामांथी खिलाडी’ हे गुजराती भाषिक पुस्तकाचंही त्यांनी लिखाण केलं होतं. त्याचकाळात त्यांनी लिखाण केलेले पुस्तकं जबरदस्त गाजले.