सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) एकापाठोपाठ एक चित्रपट येत आहेत, आशयघन चित्रपटाला यश मिळत आहे तर अनेक चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र याला अभिनेता रणबीर कपूर याच्या ‘शमशेरा’ (Shamshera) या चित्रपट अपवाद ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याला कारण म्हणजे ‘शमशेरा’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. (Even before the release of the movie ‘Shamshera’, the advance booking of this movie is getting huge response) दरम्यान, हा सिनेमा 22 जुलै रोजी म्हणजे उद्या प्रदर्शित होत आहे. (22 July Release) यशराज फिल्मचे (Yashraj Flims) एकामागून एक चित्रपट म्हणजे बंटी और बबली, पृथ्वीराज (Bunty Aur Babli, Prithviraj) असे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ‘शमशेरा’ या चित्रपटाकडून यशराजच्या टिमला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटाला चांगले यश मिळेल, असं चित्रपट विश्लेषकांना सुद्धा वाटत आहे.
[read_also content=”आरे कारशेडबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, आरे कारशेडच्या कामावरील बंदी उठवली https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-big-decision-regarding-aarey-carshed-ban-on-aarey-carshed-work-lifted-306537.html”]
दरम्यान, ‘शमशेरा’ हा चित्रपट उद्या जरी प्रदर्शित होत असला तरी, या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगने अजूनपर्यंत 12 कोटीचा गल्ला जमवला आहे. रणबीर कपूर जवळपास ५ वर्षानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाआधी रणबीर कपूर संजू चित्रपटामध्ये दिसला होता. जो खूप ब्लॉकबस्टर सिद्ध झाला होता. यावेळी सुद्धा रणबीर कपूरचा (Ranbeer Kapoor) शमशेरा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल असं दिसून येत आहे. पहिल्या दिवशी तरी 12 कोटीपेक्षा अधिक हा सिनेमा कमाई करेल असा अंदाज आहे. करण मल्होत्रांच्या दिग्दर्शनात बनलेला शमशेरा चित्रपटात रणबीर कपूर व्यतिरिक्त वाणी कपूर आणि संजय दत्त (Ranbeer Kapoor, vani kapoor, sanjay dutt) सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच निर्मात्यांनी चित्रपटाचं ‘काले नैना’ गाणं रिलीज केलं आहे. या गाण्याला मोठा रिस्पॉन्स मिळाला आहे.