टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध रिऍलिटी शो ‘खतरों के खिलाडी 14’ शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच हा या शोची शूटिंग सुरु होणार आहे. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. खतरों के खिलाडी हा शो लवकरच प्रदर्शित होणार आहे. याचदरम्यान या नव्या सीझनमध्ये कोणते नवे खेळाडू येणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आतापर्यंत अनेक स्टार्सचीच नावे समोर येत होती. पण आता या शोला पहिला कन्फर्म स्पर्धक मिळाला आहे. या यादीमध्ये पहिला कन्फर्म सदस्य ज्यात बिग बॉस 17 च्या स्पर्धकाचाही समावेश आहे.
आता रोहित शेट्टीच्या शोसाठी बिग बॉस 17 च्या स्पर्धकाची पुष्टी झाली आहे. हा स्टार दुसरा कोणी नसून बिग बॉस १७ चा रनर अप अभिषेक कुमार आहे. अभिषेक कुमार खतरों के खिलाडी 14 चा पहिला कन्फर्म केलेला स्पर्धक बनला आहे. टेलिचक्करच्या रिपोर्टनुसार, अभिषेक कुमार धोक्यांसोबत खेळण्यासाठी तयार आहे. अभिषेक रोहित शेट्टीच्या शोचा पहिला कन्फर्म केलेला स्पर्धक बनला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक कुमार ‘खतरों के खिलाडी 14’ च्या सेटवर देखील स्पॉट झाला आहे. शोचा प्रोमो शूट करण्यासाठी अभिषीत तिथे पोहोचला होता. तथापि, अद्याप अभिषेकने याला दुजोरा दिलेला नाही किंवा निर्मात्यांनी असे कोणतेही अधिकृत विधान जारी केले नाही.
रोहित शेट्टीने बिग बॉस 17 मध्ये जाऊन टॉप 5 स्पर्धकांना एक टास्क करायला लावला होता, जो अभिषेक कुमारने जिंकला होता. त्यावेळी रोहितने अभिषेकला शो ऑफर केला होता. मात्र या शोला ‘हो’ म्हणण्याऐवजी अभिषेकने चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या शोसाठी स्टार्सनाही संपर्क करण्यात आल्याची माहिती आहे. स्टारची नावे समोर आली आहेत. आता या शोमध्ये कोणते स्टार्स दिसणार हे पाहणे बाकी आहे.