दिल्ली : मागील अनेक महिन्यांपासून सुकेश चंद्रशेखरच (Sukesh Chandrashekhar) गैरव्यवहार प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरने २०० कोटींचा केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. याप्रकरणात प्रामुख्याने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचे (Jacqueline fernandez) नाव यात समोर येत असून तिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. जॅकलिनला याप्रकरणी चौकशीसाठी दिल्ली पोलिसांकडून पुन्हा समन्स बजावण्यात आले असून आज १९ सप्टेंबर रोजी तिची चौकशी करण्यात येणार आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या विरोधात दिल्ली पोलीस सातत्याने तपास करत आहेत. जॅकलिन फर्नांडिससोबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर लिपाक्षीलाही पोलिसांनी समन्स बजावले असून या प्रकरणी जॅकलिनला आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन अनेकवेळा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली आहे. ज्यामध्ये तिने सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे मान्य केले होते.
Delhi Police has summoned actor Jacqueline Fernandez to appear before the Economic Offences Wing at 11am tomorrow, September 19th for questioning in the Sukesh Chandrashekhar money laundering case: EOW
(File photo) pic.twitter.com/wd3v5DOD6N
— ANI (@ANI) September 18, 2022
जॅकलीन फर्नांडिससाठी महागडे कपडे बनवण्यासाठी फॅशन डिझायनर लिपाक्षीला सुकेश चंद्रशेखरच्या वतीने पैसेही देण्यात आले होते. त्यामुळे आज दिल्ली पोलिसांच्या ईओडब्ल्यूने या दोघांची एकत्र चौकशी करण्याची शक्यता आहे. जॅकलिन सोबतच या प्रकरणात नोरा फतेही (Nora Fatehi) आणि निकी तांबोळी (Nikki Tamboli) यांची देखील नावे समोर आली होती.
[read_also content=”टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच https://www.navarashtra.com/sports/indian-team-new-jersey-launch-for-t20-world-cup-327475/”]