काश्मिरी पंडितांच्या १९९० साली झालेल्या हत्याकांडावर आधारित ‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) या विवेक अग्निहोत्री यांच्या फिल्मने आतापर्यंत २०० करोड रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर (The Kashmir Files Box Office Collection) केली आहे आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या फिल्मला मिळाला आहे. इतिहासात नोंद करण्यात येईल अशी या फिल्मची घोडदौड आतापर्यंत सुरू होती पण गेल्या तीन दिवसांपासून प्रेक्षकांकडून कमी प्रतिसाद येत असल्यामुळे या चित्रपटाची तिकीट विक्री कमी होत आहे.
[read_also content=”या पठ्ठ्यांनी तर कमालच केली राव ! स्कायडायव्हिंग केल्यावर उंच आकाशात केला भन्नाट डान्स – पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/viral/sky-diving-and-dance-viral-video-on-instagram-nrsr-259147.html”]
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाईल्स’ या सिनेमाने सोमवारी १२.५० करोड, मंगळवारी १०.५० करोड आणि सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या तेराव्या दिवशी म्हणजे बुधवारी केवळ ८ करोड रुपयांची कमाई केली आहे. हा घटणारा ग्राफ बिझनेस करता फार काही चांगला संकेत देत नसून ‘द काश्मीर फाईल्स’ला ३०० करोड च्या क्लबमध्ये सामील होण्यास मोठा अडथळा निर्माण करणारा आहे.
२०० करोडच्या क्लबमध्ये स्थान
‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपट केवळ २५ करोडच्या बजेटसोबत बनवण्यात आला होता पण प्रेक्षकांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद आणि प्रेम यामुळे हा सिनेमा इतिहास रचू शकला आहे. कोरोना महामारीनंतर बॉलिवूडच्या २०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.यापूर्वी अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने १९४ करोडपर्यंतचा पल्ला गाठला होता. पण लवकरच प्रदर्शित होणारा ‘आर आर आर ’ आणि गेल्या तीन दिवसांपासून थंडावलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता फिल्म ३०० करोड रुपयांची कमाई करू शकेल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
??? Same reactions everywhere. https://t.co/jMWjTbXWi2
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 24, 2022
एसएस राजामौली यांचा ‘आर आर आर ’ शुक्रवारी प्रदर्शित होत असून देशभरात ७०००-८००० स्क्रीनवर चित्रपटाची दणक्यात एंट्री करणार आहे. या चित्रपटाची चाहतावर्ग चातकाप्रमाने वाट पाहत आहे. सध्या काश्मिर फाईल्स ४००० स्क्रीनवर दाखवला जात आहे आणि देशात १०,००० स्क्रीन आहेत त्यातल्या काही स्क्रीनवर अक्षयचा ‘बच्चन पांडे’ सिनेमापण दाखवला जाईल. अशात ‘द काश्मिर फाईल्स’ ३०० करोडचा टप्पा गाठू शकेल याची शक्यता कमी असल्याचं सिनेतज्ञांच मत आहे पण २५० करोड ची मजल अजूनही हा सिनेमा मारू शकतो.
रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांचा चाहतावर्ग डोळ्यात तेल घालून सिनेमाची वाट पाहतोय त्यामुळे या ‘आर आर आर’ समोर ‘द काश्मिर फाईल्स’ कितपत तग धरू शकेल याची शंका आहे. पण काही दैवी चमत्कार झाला आणि ‘आर आर आर’ पडला तर काश्मिर फाईल्सला ३०० करोडच्या क्लबमध्ये सामील होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. पण तसं होण्याच्या शक्यता फार कमी आहेत.
१९७५ नंतर प्रेक्षकांकडून ऐतिहासिक प्रतिसाद मिळवणारी ‘द काश्मिर फाईल्स’ पहिली फिल्म आहे.अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार और भाषा सुम्बली यांचे लीड रोल असलेली आणि १९९० साली झालेल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित असलेली ही फिल्म सगळ्याच बाजूने उजवी ठरली असून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि ह्रदयात विशेष स्थान मिळवणारी ठरली आहे. १९७५ साली आलेल्या ‘जय संतोषी मां ’ या चित्रपटाची आठवण या फिल्मला मिळणाऱ्या प्रेमामुळे होत असल्याचं सिनेतज्ञांचं म्हणणं आहे. बाकी सगळे वाद बाजूला पण तिकिटांचे होणारे बुकिंग आणि चित्रपटगृहांमधील लोकांच्या प्रतिक्रिया पाहता काश्मिर फाईल्सने नक्कीच आपलं स्थान मजबूत केलं आहे.