‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर आता हा सिनेमा जगभरात प्रदर्शित अनेक ठिकाणी झाला आहे. सोमवारच्या कलेक्शनसह चित्रपटाने आता 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणखी एक मोठा टप्पा पार केला असून या वर्षातील बॉलिवूडचा दुसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.
[read_also content=”‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर मुलीला आली जाग; धर्मांतरासाठी दबाव आणणाऱ्या प्रियकरावर तरुणीकडून गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/crime/after-watching-the-kerala-story-a-girl-filed-complaint-against-her-boyfriend-who-forced-her-to-convert-nrps-402583.html”]
सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित या चित्रपटात सुरुवातीपासुनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.आता हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तामिळनाडूच्या आणि पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती. मात्र निर्मात्यांच्या आवाहनावर सुप्रीम कोर्टाने या बंदीला स्थगिती दिल्यानंतर तामिळनाडूमध्येही चित्रपट प्रदर्शित करण्यास आला आहे. याचा फायदही चित्रपटाला झाला असुन तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
‘द केरळ स्टोरी’ हा मोठा स्टारकास्ट किंवा बिग बजेट नसलेला चित्रपट होता. रिलीजपूर्वी हा चित्रपट 100 कोटींपर्यंत जाऊ शकतो, अशी अनेकांना अपेक्षाही नव्हती. पण जनतेने या चित्रपटाला चांगलच डोक्यावर घेतलेलं दिसतयं त्यामुळे बॅाक्सऑफिसवर हा चित्रपच सुसाट सुरु आहे. या सिनेमाने तिसर्या सोमवारीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 5 ते 6 कोटी रुपयांची कमाई केली आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारच्या ६.६ कोटी रुपयांच्या तुलनेत ही घट फार मोठी नाही. यासोबतच चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडाही पार केला आहे. ‘द केरळ स्टोरी’ची कमाई 18 दिवसांत 204 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. यावरून ‘द केरळ स्टोरी’ तिसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई करणार असं दिसत आहे.