फोटो सौजन्य - Sony Liv OTT
सोनी लिव्हच्या गुप्तहेरांच्या जगात घेऊन जाणाऱ्या थरारक वेब सिरीज ‘अदृश्यम २ – द इन्विन्सिबल हिरोज’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा सीझन अधिक Actionने भरपूर, रहस्याने परिपूर्ण आणि थरारक वळणांनी भरलेला असणार आहे. ४ एप्रिलपासून प्रेक्षकांना हा नवीन सीझन पाहायला मिळणार आहे, जो एका अज्ञात आणि अधिक धोकादायक शत्रूविरोधात सुरू होणाऱ्या संघर्षावर आधारित आहे. विशेष म्हणजे, यावेळी या सस्पेन्सने भरलेल्या लढाईत एक नवीन योद्धा सामील झाला आहे—अभिनेत्री पूजा गोर! ती ऑफिसर दुर्गाच्या भूमिकेत दिसणार असून तिच्या प्रवेशाने स्क्वाडला अधिक ताकद मिळणार आहे.
या वेब सिरीजमध्ये रवी वर्माची भूमिका साकारणारा अभिनेता एजाज खान म्हणतो, “‘अदृश्यम २’ अधिक मोठा, साहसी आणि थरारक आहे. या सीझनमध्ये रवी एकटा लढत नाही, तर त्याच्यासोबत पूजा गोरची दुर्गा देखील आहे. ती एक हुशार आणि निर्भय गुप्तहेर आहे, जी मिशनला एका वेगळ्या उंचीवर नेईल. या वेळी आपण अधिक घातक शत्रूंशी दोन हात करत आहोत. पहिला सीझन प्रेक्षकांना आवडला होता, पण यावेळी आणखी मोठे रहस्य आणि धक्कादायक प्रसंग असतील.”
आपल्या भूमिकेबद्दल पूजा गोर म्हणते,”दुर्गाची भूमिका माझ्यासाठी खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. ती फक्त एक ऑफिसर नाही, तर एक अथांग शक्ती आहे. तिच्यासमोर मोठी आव्हाने असतात, पण ती कधीही मागे हटत नाही. गुप्तहेर म्हणून तिच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. ‘अदृश्यम २’ प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त अनुभव ठरेल आणि हा सीझन त्यांच्या अपेक्षांपेक्षा अधिक थरारक असेल!”
‘अदृश्यम २ – द इनव्हिजिबल हिरोज’ ही मालिका एका अशा गुप्तहेर टीमवर आधारित आहे, जी संकटे टाळण्यासाठी पूर्वीच पावले उचलते. रवी वर्माच्या नेतृत्वाखालील या टीममध्ये आता दुर्गा सामील झाली आहे. या सीझनमध्ये विश्वासघात, देशभक्ती आणि जीवन-मरणाच्या संघर्षाचा थरार उलगडणार आहे. यात स्वरूपा घोष आणि तरुण आनंद यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘अदृश्यम २ – द इनव्हिजिबल हिरोज’ ४ एप्रिलपासून फक्त सोनी लिव्हवर स्ट्रीमिंग सुरू होणार आहे!