मुंबई : आपल्या सुमधुर आवाजाने गेली आठ दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांना राज्यातील सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan Award) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात हा सोहळा पार पडला. अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत त्याना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी त्यांच्या संगीत कारकीर्दीतील अनेक आठवणी शेयर केल्या.
[read_also content=”उज्जैन विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने पंतप्रधान मोदींवर केली पीएचडी! ‘या’ निर्णयांचा अभ्यासात समावेश https://www.navarashtra.com/india/a-student-of-ujjain-university-did-a-phd-on-prime-minister-modi-nrps-378351.html”]
गेट वे ऑफ इंडिया येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आशाताईंना हा पुसस्कार प्रदान देण्यात आला. शाल, मानचिन्ह आणि 25 लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, मंगेशकर परिवारातील सदस्य, संगीत-चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्यासह असंख्य मुंबईकर उपस्थित होते.
‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशा भोसले म्हणाल्या की, ‘हा पुरस्कार माझ्यासाठी भारतरत्न आहे.”
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाने विविध छटांची हजारो गाणी अजरामर करणाऱ्या आशाताई यांचा 1933 साली जन्म झाला. आशाताईंना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. 1943 साली त्यांनी आपल्या कारकिर्दिला सुरुवात केली आणि 1948 साली त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढची सात दशकं आशाताईने आपल्या सुमधुर आवाजाने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तब्बल हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये आशाताईंनी प्ले-बॅक सिंगर म्हमून गाणी गायली आहेत. बॉलिवूडमध्ये मेलडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशाताईंनी आतापर्यंत 11 हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे आशाताईंनी हिंदी-मराठीबरोबरच 20 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यात बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषांचा समावेश आहे. त्यांच्या याच कामगिरीची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली. 2011 मध्ये आशाताईंचं नाव गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं. आशाताईंना आतापर्यंत तब्बल 18 वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळालं होतं.