अंडरवर्ल्डकडून धमक्या, प्रोजेक्टही हिसकावले गेले; फेमपासून गायब होईपर्यंतचा विवेक ओबेरॉयचा प्रवास
‘शुटआऊट ॲट लोखंडवाला’, ‘ग्रँड मस्ती, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ आणि अशा अनेक हिट चित्रपटांतून अभिनेता विवेक ऑबेरॉय चर्चेत आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून विवेक ऑबेरॉय फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आहे. असं असलं तरीही तो सध्या मुंबईत राहत नाही. तो दुबईत राहतोय. नेमकं त्याने मुंबई सोडून दुबईत जाण्याचा का विचार केला ? याचं उत्तर त्याने स्वत: एका मुलाखतीतून दिले आहे.
हे देखील वाचा – तमन्ना भाटिया मिलान फॅशन वीकमध्ये रॉबर्टो कॅव्हली SS25 शोमध्ये चमकली!
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘कंपनी’ चित्रपटातून फिल्मी करियरची सुरूवात करणाऱ्या विवेकचे या चित्रपटासाठी त्याचे फार कौतुक झाले. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटही चाहत्यांना दिले. आयुष्यात सर्व काही आलबेल सुरू असताना अभिनेत्याला त्याच्या आयुष्यात अनेक चढ- उतारही पाहायला मिळाले. ‘शुटआऊट ॲट लोखंडवाला’ चित्रपटामध्ये अभिनेत्याने निगेटिव्ह रोल साकारल्यामुळे त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटानंतर अभिनेत्याला १४ महिने कोणत्याही चित्रपटांत काम मिळाले नाही.
एकेकाळी दमदार अभिनेता असलेल्या विवेकच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याला अभिनय सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्या काळात त्याच्याकडून अनेक प्रकल्पही काढून घेण्यात आले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, विवेकने त्याच्या वाईट काळाबद्दल भाष्य केले आहे. बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर पदार्पण असूनही त्याच्या हातात एकही चित्रपट नव्हता. तो कामाच्या शोधात असाताना त्याला अंडरवर्ल्डकडून धमक्याही येत होत्या. विवेकने सांगितले की, त्याच्या फिल्मी करियरमधील आव्हानांचा त्याच्या वैयक्तिक जीवनावर आणि त्याला आवडत असलेल्या लोकांवरही परिणाम झाला. त्यावेळी त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता.
हे देखील वाचा – जुनैद खान दिसणार खुशी कपूरसह रोमँटिक अंदाजात, ‘या’ चित्रपटात झळकणार दोघेही एकत्र!
एंटरटेनमेंट लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत विवेकने सांगितले की, “माझ्यासोबत वाईट काळ अनेक दिवस होता. वाईट काळात मला ट्रोलिंग आणि अपमानालाही सामोरे जावे लागले. मी प्रोजेक्ट साईन केल्यानंतर, माझ्याकडून प्रोजेक्ट काढून घेण्यात आला होता. शिवाय, मला अंडरवर्ल्डकडूनही धमक्या मिळाल्या होत्या. शेवटी पोलिसांना माझ्या सुरक्षेसाठी माझ्यासोबत एक बंदूकधारी गार्ड आणि माझ्याकडेही एक बंदूक त्यांना द्यावा लागली होती. त्या काळात माझ्यासोबत कुटुंबाचीही मला काळजी वाटत होती कारण माझ्या सुरक्षेसाठी माझ्याकडे बंदूक होती. पण माझी आई, बहीण आणि वडिलांचे काय ? मला त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली होती.”