Satish Kaushik Birthday
कलाकाराची केव्हा कला मरत नसते, एखादा कलाकार आपल्या कलाकृतीतून सदैव अमर असतो… असं कायम म्हणतात. असंच काहीसं घडलंय, दिवंगत बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्याबाबतीत… अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन होऊन आज जवळपास दोन वर्षे होऊन गेली आहेत. ते आपल्या कलाकृतीतून आपल्या चाहत्यांमध्ये सदैव जिवंत राहिले आहेत. खरंतर, आज सतीश कौशिक यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या फिल्मी करियरवर प्रकाश टाकणार आहोत. बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेते असलेल्या सतीश कौशिक यांच्यावर एक वेळ अशी आली होती की ते स्वतःचं आयुष्य संपवणार होते.
हल्ला झाल्यानंतर करीना कपूर सैफ अली खानला काय म्हणाली ? चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा
१३ एप्रिल १९५६ रोजी जन्मलेल्या सतीश यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. याचसोबत अभिनयाचा प्रवासही सुरू केला होता. अर्थात हा प्रवास सोपा नव्हताच. सतीश कौशिक यांच्या करियरची सुरुवात काहीशी वेगळी झाली. नसिरुद्दीन शाह यांनी शिफारस केल्याने सतीश कौशिक शेखर कपूरला भेटायला गेले होते. त्यानंतर मग शेखर यांनी सतीश यांना ‘मासूम’ चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम दिले. पण सतीशचं नशीब खरं पालटलं ते मिस्टर इंडियामुळे… शेखर कपूरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला. या सिनेमानंतर सतीशचे अनिल, बोनी आणि कपूर कुटुंबाशी चांगले संबंध निर्माण झाले.
ACP प्रद्युम्न यांची CID मध्ये होणार दणक्यात एन्ट्री, चाहत्यांच्या आग्रहास्तव मेकर्सचा निर्णय
त्यानंतर सतीश यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले. १९९३ साली रिलीज झालेल्या ‘रुप की रानी चोरों का राजा’ या मल्टीस्टारर बिगबजेट चित्रपटातून सतीश यांनी दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतू त्यांचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. हळव्या मनाच्या सतीश कौशिक यांच्या मनाला ही गोष्ट खूप लागली. या चित्रपटामध्ये, प्रमुख भूमिकेत अनिल कपूर, श्रीदेवी आणि जॅकी श्रॉफ आहे. त्यावेळी सतीश यांनी एका हॉटेलमध्ये सुसाईड करण्याचा मनात विचारही केला होता. त्यावेळी त्यांना खिडकीतून उडी मारावीशी वाटली होती. कारण, त्यांना मिळालेल्या अपयशाचा सामना करू शकत नव्हते.
‘शिल्पा शेट्टी, तुझसे मेरी नजर नहीं हटती’ लाल रंगात हुस्नपरी
“मला वाटले होते की, खाली खूप खाण्याच्या गोष्टी आहेत. या विचाराने मी आयुष्य संपवलं अशी चर्चा होऊन लोकं माझ्या मृत्यूची मस्करी करतील, असा विचार माझ्या मनात आला,” अशी भावना सतीश यांनी व्यक्त केली होती. पुढे मात्र सतीश यांनी अपयशाची मरगळ झटकुन एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली