छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त रिऍलिटी शो म्हणजे बिग बॉस. हा शो भारताप्रमाणेच इतर देशांमध्येही फार आवडीने बघितला जातो. आतापर्यंत मराठी बिग बॉस मराठीचे चार सीजन पूर्ण झाले आहेत आणि आता लवकरच याचा पाचवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच याच्या पाचव्या सिजनची घोषणा झाली असून या आगामी सिजनचे सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.
काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिजनचा प्रोमो आऊट झाला. याला पाहून अनेक प्रेक्षक थक्क झाले. याचे कारण म्हणजे सलग चार वर्ष सूत्रसंचालन केल्यानंतर आता पाचवा सिजनमध्येही महेश मांजरेकर सूत्रसंमचालंन करतील असे अनेकांना वाटले होते. पहिल्या चार पर्वात महेश मांजरेकर होस्ट म्हणून दिसले होते. बिग बॉस आणि स्पर्धकांची शाळा घेण्याचे काम मांजरेकर करायचे. त्यांची स्टाइल अनेकांना फार आवडायची. मात्र नुकताच रिलीज झालेल्या प्रोमोत रितेश देशमुखला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानंतर मांजरेकरांनी हा शो का सोडला असा प्रश्न अनेकांना पडू लागला. तर आता याचे खरे कारण समोर आले आहे.
[read_also content=”खतरो के खिलाडीच्या नव्या सीझनमधील पहिल्याच टास्कमध्ये हे खेळाडू फेल https://www.navarashtra.com/movies/this-player-failed-in-the-very-first-task-in-the-new-season-of-khatron-ke-khiladi-season-14-541778.html”]
बिग बॉसच्या पाचव्या सिजनची धुरा यावेळी मांजरेकरांच्या ऐवजी रितेश देशमुखच्या हातात गेली आहे. यासाठी अनेकजण आता उत्सुक आहेत तर काहीजण महेश मंजेकरांना मिस करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, महेश मांजरेकरांचा बिग बॉससोबतचा करार आता संपुष्टात आला आहे. त्यांना पाचव्या सिजनचे होस्टिंग करायचे होते मात्र इतर कामांमुळे त्यांना करार करण्यासाठी त्यांना मिळाला नाही. त्यानंतर कलर्स मराठीने यंदाच्या सीझनसाठी होस्ट म्हणून अभिनेता रितेश देशमुखची निवड केली आणि त्यानेही ही ऑफर लगेच स्वीकारली.
प्रोमो पहा:
दरम्यान या सिजनमध्ये नक्की कोणत्या सेलिब्रिटींची एन्ट्री होणार आहे, यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. त्याचबरोबर बाकी सिजनप्रमाणेच हाही सीजन तितकाच मनोरंजनाने भरलेला असेल की नाही, ते पाहणे फार महत्त्वाचे ठरेल.