नसांमध्ये चिटकून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत काम, मानसिक तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, चुकीच्या सवयी इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. हल्ली हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शरीरात वाढलेला लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे आरोग्यासंबंधित शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करते. पिवळ्या रंगाचा चिकट थर रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहतो, ज्यामुळे हार्ट ब्लॉकेज किंवा हार्ट अटॅक येऊन कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – istock)
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पालेभाज्या, फळे, सुका मेवा, धान्य इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीर कायमच निरोगी राहील. रोजच्या आहारात नियमित फळांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं आणि खनिजे इत्यादी गुणधर्मांनी समृद्ध असलेली फळे शरीरासाठी गुणकारी ठरतात. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी एक सफरचंद खावे. यामध्ये पेक्टिन नावाचे फायबर आढळून येते. शरीरात जमा होणारे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सफरचंद खावे. सफरचंदातील अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेला प्लेक कमी करण्यासाठी मदत करते. सफरचंद खाल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
रोजच्या आहारात आंबट आणि विटामिन सी युक्त फळांचे नियमित सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे हृदयाला अनेक फायदे होतात. संत्र्यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. संत्री खाल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. नियमित एक संत्र खाल्यास रक्तभिसरण सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
गोड चवीचा पपई सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पपईमध्ये असलेले पापेन शरीरासाठी अतिशय महत्वाचे ठरते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित पपई खावा. याशिवाय पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यासाठी नियमित पपई खावा.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हा एक प्रकारचा स्निग्ध पदार्थ आहे, जो शरीरातील पेशींच्या निर्मितीसाठी, यकृताला पित्त तयार करण्यासाठी आणि हार्मोन्ससाठी आवश्यक असतो.
कोलेस्ट्रॉलचे प्रकार:
लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन याला ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल म्हणतात. हे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन प्लाक (Plague) तयार करते, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
जास्त कोलेस्ट्रॉलचे परिणाम:
रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्ताचा प्रवाह कमी होतो.
रक्तवाहिनीत प्लाक फुटल्यास रक्ताची गुठळी तयार होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो.