(फोटो सौजन्य - x अकाउंट)
समय रैनाच्या (Samay Raina) ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ (India’s Got Latent) या शोमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (You tuber Ranveer Allahbadia) केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी समय रैना, बलराज घाई तसेच अन्य काही प्रसिद्ध युट्यूबर्स आणि सेलिब्रिटींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता सायबर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’या शोचे आतापर्यंत प्रसारित झालेले सर्व १८ एपिसोड्स काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
‘खूब चेहरे के जादू से, दिल लुटने का इरादा…’ ‘या’ अभिनेत्रीने मोडल्या Cutenessच्या मर्यादा
युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अलीकडेच रणवीर इलाहाबादियाने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये त्याने आई- वडिलांबद्दल एक विनोद केला, त्यानंतर त्याला सतत विरोध होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’च्या ताज्या एपिसोडमधील वादग्रस्त भाग पाहून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एफआरआयनुसार एकूण 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणी युट्यूबला पत्र लिहिले आहे. पत्रात पोलिसांनी ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’शोचे सर्व १८ आक्षेपार्ह एपिसोड्स युट्यूबवरून तात्काळ हटवण्यास आणि चॅनेलवर कारवाई करण्यास सांगितले आहे. याशिवाय, YouTube ला अशा सर्व सामग्रीची तपासणी करून ती हटविण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र सायबर पोलिस या प्रकरणात खूप कडक दिसत आहेत.
या प्रकरणात अनिल कुमार पांडे यांनी सायबर पोलिसात ३० जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. प्रथम सायबर पोलिसांनी सर्व भागांची चौकशी केली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व लोक शोच्या जज पॅनेलचा भाग आहेत. याशिवाय, पोलिसांचे पथक रणवीर अलाहाबादिया यांच्या घरीही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोहोचले. या प्रकरणात सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर अपूर्व माखीजाचीही चौकशी करण्यात आली. सायबर पोलिसांनी तिची २ तास चौकशी केली. या शोमध्ये अपूर्वा माखीजानेही खूप अश्लील टिप्पण्या केल्या होत्या आणि स्पर्धकाला शिवीगाळही केली होती हे ज्ञात आहे. या मुद्द्यावरुन सध्या सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ सुरु आहे.
“मुलगी नको, मुलगा पाहिजे.., ” वारसा गमावण्याच्या भीतीपोटी मेगास्टार चिरंजीवी यांची मुलाकडे मागणी
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला आहे. समय रैनाच्या शोमध्ये अनेक स्टँड अप कॉमेडियन आणि प्रसिद्ध युट्यूबर्स सहभागी होतात. तो रोस्ट शैलीद्वारे आपल्या चाहत्यांचे निखळ मनोरंजन करण्याचा तो प्रयत्न करतो. पण अलिकडेच जेव्हा रणवीर अलाहाबादिया या शोचा भाग झाला तेव्हा त्याने एक विनोद केला जो आई- वडिलांबद्दल होता आणि समाजाच्या मानवी मर्यादा ओलांडणारा होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व बाजूंनी या शोवर विरोध केला जात आहे. मनोज बाजपेयी, इम्तियाज अली, सुनील पाल आणि मनोज मुंतशीर यांसारख्या कलाकारांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.