(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
विजय देवरकोंडाच्या ‘व्हीडी १२’ या तात्पुरत्या नावाखाली प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे नाव आता निर्मात्यांनी अखेर जाहीर केले आहे. खरंतर, चित्रपटाचा टीझर आज बुधवारी रिलीज झाला आहे. येथूनच चित्रपटाचे शीर्षक जाहीर करण्यात आले आहे. आणि चित्रपटाचे नाव ‘किंगडम’ असे ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट आणि टीझरबाबत आता आपण आता जाणून घेणार आहोत.
विजय देवरकोंडाने दाखवली अॅक्शन
आज प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये विजय देवरकोंडा त्याच्या अॅक्शन कौशल्याचे प्रदर्शन करताना दिसत आहे. हा टीझर सुमारे एक मिनिट आणि ५५ सेकंदांचा आहे. ‘किंगडम’ नाव असल्याने चित्रपटाची कथाही अशीच आहे. सितारा एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवर हा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट गौतम तिन्नानुरी यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाचा टीझर खूपच धमाकेदार आहे. आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात वाढली आहे.
“मुलगी नको, मुलगा पाहिजे.., ” वारसा गमावण्याच्या भीतीपोटी मेगास्टार चिरंजीवी यांची मुलाकडे मागणी
विजय देवेराकोंडाने शेअर केली पोस्ट
टीझरमध्ये विजय देवरकोंडा तुरुंगात कैद झालेला दिसतो आहे. हा चित्रपट ३० मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विजय देवरकोंडा यांनीही एक पोस्ट शेअर केली आहे आणि चाहत्यांना चित्रपटाचे शीर्षक सांगितले आहे. अभिनेत्याने पोस्टर शेअर करताना लिहिले की, ‘चित्रपटाचे नाव ‘किंगडम’ आहे.’ प्रश्न, चुका, रक्तपात आणि नशीब…’ असे लिहून अभिनेत्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. आणि चाहत्यांना त्याचा लूक प्रचंड आवडला आहे.
अपूर्वा मखीजाचा पोलिसांनी नोंदवला जबाब; खार पोलिस स्टेशनला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झाली हजर!
वापरकर्त्यांनी दिला प्रतिसाद
टीझरवर वापरकर्ते प्रतिक्रिया देत आहेत. हा टीझर हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत रणबीर कपूर आवाज या चित्रपटाला लाभला आहे. वापरकर्त्यांना त्याची शैली आवडत आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. थिएटरनंतर, तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.