मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री तन्वी मुंडले तिच्या अभिनयाने आधीच महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. पण अभिनेत्री यावरच थांबली नसून, तिने तिच्या गोंडसपणाचा वापर करून आता तरुणांच्या हृदयात घुसण्याचे ठरवले आहे. तिने तिचा सुंदर आणि स्टाईलिश असा फोटोशूट तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.
तन्वी मुंडलेचा नवा फोटोशूट पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री तन्वी मुंडलेने तिच्या @tanvimundle या इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री फारच गोंडस दिसत आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये तन्वीची स्टाईल पाहता चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिच्या स्टाईलचे अनेक नेटकरी दिवाने झाले आहेत.
तन्वीने ऑफ शोल्डर वनपीस आणि त्यावर तपकिरी रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. तिच्या या अप्रतिम आऊटफिटचे भरपूर कौतुक केले जात आहे.
'अभिनेत्री चित्रपटांमध्ये केव्हा पदार्पण करणार?' असा प्रश्न नेटकऱ्यांनी कॉमेंट्समध्ये केला आहे. तसेच तन्वीच्या उत्तराची प्रतीक्षा आहे असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
तिच्या या गोड फोटोशूटकडे पाहता 'गोंडस" हाच शब्द मुखात येत आहे. छायाचित्रांना १० हजारांच्या वर लाईक्स मिळाले आहेत.