(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून सुरु असलेला वाद काही कमी होत नाही आहे. अलिकडेच संजयची बहीण मंधीरा कपूरनेही असा दावा केला आहे की, संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेवसह अनेकांनी तिच्या आईला कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले होते. आता या प्रकरणात, करिश्मा कपूरनेही मालमत्तेत वाटा मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच आता संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेववर अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आले आहे.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा सुरु झाला नवा अध्याय, ‘या’ अभिनेत्रीने केली एन्ट्री
आता या प्रकरणात, करिश्मा कपूरची मुले, समायरा आणि कियान यांनीही त्यांचे दिवंगत वडील संजय कपूर यांच्या मालमत्तेत वाटा मिळावा यासाठी न्यायालयाचे दार ठोठावत आहेत. दोन्ही मुलांनी दाखल केलेल्या दाव्यात असा दावा करण्यात आला आहे की, त्यांची सावत्र आई प्रिया सचदेव यांनी संजयचे खोटे मृत्युपत्र तयार केले आहे. त्यांच्या मते, संजयने केलेल्या मृत्युपत्रावर कायदेशीर स्वाक्षरी नाही, तर ते बनावट आणि आणि नकली असल्याचे सांगितले आहे.
मुलांच्या हक्कांसाठी करिश्मा आली पुढे
हे सर्व दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेबाबत घडत आहे. करिश्मा तिच्या दोन्ही मुलांसह आता न्यायालयात पोहोचली आहे आणि त्यांच्या सावत्र आईने म्हणजेच प्रियाने मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली आहे. मुलांचे म्हणणे आहे की प्रिया तिचा कट रचून मृत्युपत्रात काही बदल करत आहे. करिश्मा तिच्या मुलांच्या हक्कांसाठी कायदेशीररित्या पुढे आली आहे. तिने मालमत्तेचे विभाजन, खात्यांची संपूर्ण माहिती आणि प्रतिवादींवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
वल्लरी देणार का मनोजला घटस्फोट? ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेला नवं वळण
मुलांनी प्रियावर केले गंभीर आरोप
करिश्मा कपूरने याचिका दाखल करताना म्हटले आहे की संजय कपूरच्या मृत्यूच्या वेळी मुलांना मालमत्तेबद्दल कोणतीही माहिती नव्हती. प्रियावर गंभीर आरोप करत तिने म्हटले आहे की तिने अनेक गोष्टी उघडकीस येऊ दिल्या नाहीत आणि त्या लपवून ठेवल्या. आधी तिने सांगितले की कोणतेही मृत्युपत्र नव्हते. परंतु नंतर तिने मार्च २०२५ चे मृत्युपत्र उघड केले, ज्यावर मुलांनी बनावट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आता सुमारे ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर अनेक दावेदार आहेत. प्रिया आणि तिचा मुलगा, संजयची आई. करिश्माची मुले म्हणतात की त्यांचे वडील त्यांना नेहमीच सांगत असत की त्यांनाही समानतेचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या नावावर व्यवसाय देखील सुरू केला होता. त्यांनी ट्रस्टमध्ये हिस्साही दिला होता. अशा परिस्थितीत, त्यांच्या मृत्यूनंतर बरेच काही बदलले आहे. तसेच १२ जून रोजी लंडनमध्ये पोलो खेळताना संजर कपूर यांचे निधन झाले. आता मालमत्तेच्या वादावरून संपूर्ण कुटुंब न्यायालयात वारंवार उपस्थिती दाखवत आहे.