(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ काही दिवसांपूर्वीच त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शोमध्ये प्रमुख भूमिका साकारलेला नितीश चव्हाण आणि अभिनेत्रीने साकारलेल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण या शोला ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात एकही नॉमिनेशन मिळालं नाही, ज्यामुळे शोच्या समारोपाची दाट शक्यता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
शिवा मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या पाठोपाठ आता ‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका बंद होण्याची दाट शक्यता आहे. या मालिकेतील अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.‘लाखात एक आमचा दादा’ही मालिका निरोप घेण्याच्या चर्चा सुरू असतानाच यामध्ये राजश्रीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ईशा संजयने शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शाहरुख, सलमान, आमिर, बादशाह, रणवीर सिंग आणि अनेक स्टार्स एकाच सीरिजमध्ये! कधी, कुठे बघाल ?
ईशाच्या पोस्टमध्ये काय?
ईशाने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, “राजश्रीच्या भूमिकेसाठी शेवटचं तयार होताना…” असं कॅप्शन देऊन, तिने व्यक्त केले की “मन खूप भरून आलंय… आणि आता फक्त आठवणी कायमस्वरुपी जवळ राहणार आहेत. डोळ्यांत पाणी आहे अन् हात थंड पडलेत.” तिच्या पोस्टमध्ये ती म्हणते, “१ वर्ष ५ महिने झाले… आता राजूच्या भूमिकेतून तुमचा निरोप घेते. लाखात एक आमचा दादा… Signing Off As Raju.”
करिश्मा कपूरच्या मुलांना नाही मिळाले त्यांच्या हक्काचे १९०० कोटी रुपये; सावत्र आईने केला विश्वासघात?
सध्या ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. या पोस्टमुळे ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून ईशा राजश्रीच्या भूमिकेतून एक्झिट घेणार की आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.
झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिली आहे . या मालिकेत नितीश चव्हाण याने प्रमुख भूमिका साकारली आहे, ज्यात त्याने सूर्या दादाची भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे. तसेच, या मालिकेत मृण्मयी गोंधळेकर, गिरीश ओक, कोमल मोरे, राजश्री निकम, समृद्धी साळवी, जुई तनपुरे, ईशा संजय, आणि मधुगंधा कुलकर्णी यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये अभिनय केला आहे.