सध्याच्या घडीला किटेक्स गारमेंट्स लिमिटेड या कंपनीची सगळीकडे चर्चा होत आहे. कारण या कंपनीने गेल्या काही महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत.
5 महिन्यांत 200 टक्क्यांनी रिटर्न्स, अनेकांना मालामाल करणारी 'ही' कंपनी आहे तरी कोणती?
Stock Market : किटेक्स गारमेंट्स लिमिटेड या कंपनीला आज बीएसईवर आज पुन्हा एकदा अपर सर्किट लागले आहे. अपर सर्किटमुळे या कंपनीच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली असून, हा शेअर 642.15 रुपयांवर पोहोचला आहे.
मागणी वाढल्यामुळे चालू वित्त वर्षातील दुसऱ्या तिमाहीत या कंपनीला मोठा नफा झाला आहे. 4 जून 2024 रोजी किटेक्स गारमेंट्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरचे मूल्य 190.60 रुपये होते. गेल्या पाच महिन्यात हा शेअर 237 टक्क्यांनी वाढला आहे.
दुसऱ्या तिमाहीत जुलै ते सप्टेंबर 2024 या काळात या कंपनीचा एकूण नफा 39.94 रुपये होता. एका वर्षापूर्वी या कंपनीचा निव्वळ नफा 13.21 कोटी रुपये होता.
या कंपनीत प्रमोटर्सची हिस्सेदारी 56.66 टक्के आहे. या कंपनीत सामान्य गुंतवणूकदारांची मालकी 43.34 टक्के आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)