अलीकडेच, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जेरेमी लंडन यांनी इन्स्टाग्रामवर हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले ३ पूरक आहार शेअर केले. तथापि, त्यांनी या पोस्टमध्ये असेही म्हटले की पूरक आहार हे केवळ एक सहाय्यक उपाय आहेत, यामुळे अगदीच शरीरामध्ये जादूई परिणाम होईल असं नाही. जगभरात हृदयरोग हा मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. म्हणून, हृदय निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी तज्ज्ञ CoQ10, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि मॅग्नेशियम घेण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या महत्त्वाची माहिती (फोटो सौजन्य - iStock)
आजकालच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे सर्वाधिक त्रास हा तरूणांना होतोय. कोलेस्ट्रॉल वाढणे, डायबिटीस असणे आणि याचा थेट परिणाम हृदयावर झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने अनेक जणांचा मृत्यू होतोय. यासाठी हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय खावे जाणून घ्या
मॅग्नेशियम हे शरीरातील एक आवश्यक खनिज आहे, जे हृदयाच्या स्नायू आणि नसांच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहे. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि अनियमित हृदयाचे ठोके (अॅरिथमिया) रोखण्यास मदत करते
मॅग्नेशियमसाठी तुम्ही पालेभाज्या, काजू, बिया, संपूर्ण धान्य खाऊ शकता. याशिवाय, तुम्ही दररोज २००-४०० मिलीग्राम घेऊ शकता यासाठी मॅग्नेशियम सायट्रेट किंवा ग्लाइसिनेट घेणे चांगले ठरते
ओमेगा-३ फॅटी अॅसिड प्रामुख्याने माशांच्या तेलात आढळतात आणि हृदयासाठी सर्वात महत्वाचे पोषक घटक आहेत. हे उच्च रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करते
यासाठी तुम्ही सॅल्मन, मॅकरेल, सार्डिनसारखे तेलकट मासे खाऊ शकता. याशिवाय, तुम्ही दररोज १०००-२००० मिलीग्राम सप्लिमेंट्स घेऊ शकता ज्याचा तुम्हाला हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो
CoQ10 हा एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जो हृदयाच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो. हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होते, परंतु वृद्धत्व, ताणतणाव आणि काही औषधे जसे की स्टॅटिन यामुळे पातळी कमी होऊ शकते
CoQ10 हा नैसर्गिक स्रोत आहे. यासाठी तुम्ही मांस, तेलकट मासे, काजू खाऊ शकता आणि त्याशिवाय तुम्ही दररोज १००-३०० मिलीग्राम सप्लिमेंट्स घेऊ शकता.