मुंबई शहर येथील स्वादिष्ट स्ट्रीट फूड्स साठी प्रसिद्ध आहे. मुंबईची खाद्य संस्कृती जगभरामध्ये नावाजली आहे. मुंबईचा वडापाव शहराची ओळख बनली आहे. मुंबईची ही खाद्य संस्कृती जपण्याचे योगदान येथील ठेलेवाले, रेस्टोरंट तसेच हॉटेल्स करत आहेत. परंतु मुंबईच्या खऱ्या खाद्य संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी मुंबईतील खाऊ गल्लीला नक्की भेट द्यावे. शहराच्या कोपऱ्यान कोपऱ्यामध्ये अशा अनेक खाऊ गल्ल्या आहेत ज्या खाद्य परंपरेचा वारसा जपत आहेत.
मुंबईतील ५ प्रसिद्ध खाऊ गल्ली. (फोटो सौजन्य : Social Media)
घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेली खाऊ गल्ली सगळ्यांनाच परिचित आहे. संध्याकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत येथे फ्रँकी, कबाब तसेच उत्तम फाफडा जलेबी मिळते.
मांसाहारी लोकांसाठी उत्तम ठिकाण म्हणजे मुंबईतील मोहम्मद अली रोड. येथील शमी कबाब, तंदुरी चिकन तसेच शाही तुकडा नक्की खाऊन पहा.
सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत मुंबईच्या चेंबूर कॅम्प येथे उत्तम दाल पकवान तसेच रगडा पॅटीस मिळते. येथील कोकी ही डिश फार प्रसिद्ध आहे.
खार तसेच वांद्र्याचे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे कार्टर रोड. येथील रोल्स, मोमोज, श्र्वारमा तसेच फलाफेल खाण्यासाठी जगभरातून खवय्ये येत असतात.
मुंबईच्या झवेरी बाजार मधील तवा पुलाव मुंबईकरांचा जीव आहे. येथील कचोरी तसेच दाबेली जगप्रसिद्ध आहे.