आजचा दिवस फार खास आहे कारण आज आहे आषाढी एकादशी. हा एक मंगलमय दिवस असून या दिवशी अनेक वारकरी पायावरी करत भगवान विठ्ठलाच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. या खास दिवशी आम्ही तुमच्यासाठी लहान मुलींची काही खास नावे घेऊन आलो आहोत.
विष्णूंशी संबंधित नवजात मुलींसाठी खास नावे
आज आम्ही सांगत असलेल्या मुलींच्या नावाचा अर्थ भगवान विठ्ठलाशी जोडलेला आहे
आन्या - हे नाव भगवान विष्णूंच्या आशीर्वाद आणि सकारा त्मक उर्जेशी संबंधित आहे. हे नाव ठेवल्याने भगवान विष्णूंचा तुमच्या मुलीवर सदैव कृपा राहील.
ईशानी - हे नाव ताकदीचे प्रतिनिधित्व करते. विष्णूशी संबंधित हे नाव तुम्ही तुमच्या गोंडस मुलीला देऊ शकता
अनिका - या शब्दाचा अर्थ होतो चमक किंवा सौंदर्य. 'अनिका' हे पारंपरिक तसेच आधुनिक नाव आहे, त्यामुळे हे नाव सर्वांनाच फार आवडेल
भूमि - जेव्हा विष्णू पृथ्वीवर अवतरले, तेव्हा त्यांना भूमीने आश्रय दिला. रामाच्या अवतारात भगवान विष्णूंनी सीतेशी विवाह केला आणि सीतेचा जन्म पृथ्वीपासून झाला आहे.