अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे साधेपणातील सौंदर्य चाहत्यांच्या हृदयाचा ठाव घेत असते. नुकतेच रिंकूने चंदेरी सिल्क साडीमधील काही फोटो शेअर केले असून इंटरनेटवर पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने भुरळ घातली आहे. रिंकूचा हा लुक पाहून सुंदर दिसण्यासाठी नुसतं ग्लॅमर असण्याची गरज आहे या समजुतीला पूर्णतः रोख लावला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. रिंकूचा हा साज पाहून सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे, पहा रिंकूचा हा सोज्वल जीवाचा ठाव घेणारा लुक (फोटो सौजन्य - Instagram)
रिंकू राजगुरू नेहमीच आपल्या सौंदर्याने आपल्या चाहत्यांच्या मनावर भुरळ घालत असते आणि आता तिचा हा साडीतील लुक पाहून पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय
डार्क मरून चंदेरी सिल्क साडी आणि त्यावर सोनेरी बुट्ट्या असणारे डिझाईन अत्यंत क्लासी आणि रॉयल वाटत आहे. रिंकूची ही साडी आणि तिच्या अदांनी इंटरनेटवर आग लावली आहे
मराठमोळा लुक करत रिंकूने केसांचा अंबाडा घातला आहे आणि त्यात गजरे माळले आहेत, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडल्याचे दिसून येत आहे
या चंदेरी सिल्क साडीसह रिंकूने गळाबंद चोकर घातला असून त्यासह तिने हातात मॅचिंग बांगड्या, अंगठीही घातली आहे आणि यासह मॅचिंग कानातले घातले आहेत
रिंकूने प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत आणि त्यापैकी काही फोटो ब्लॅक अँड व्हाईट असून त्यामध्ये तिचा लुक अधिक उठावदार दिसतोय
कपाळावर मरून टिकली, बेसिक फाऊंडेशन, डार्क काजळ, आयलायनर, डार्क भुवया, हायलायटर आणि ओठांवर ग्लॉसी लिपस्टिक लावत लुक पूर्ण केलाय