सई ताम्हणकर डब्बा कार्टेलच्या ट्रेलर लाँचसाठी खास अंदाजात दिसली आणि तिच्या या लुकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कॉन्सेप्ट फोटोशूटमध्ये तिच्या या खास ओव्हरकोट लुकने पुन्हा ती चर्चेत आली आहे
बॉलिवूडमध्ये जिच्या अनोख्या प्रोजेक्ट्सचा सिलसिला सुरू आहे अशी पाथब्लेझर अभिनेत्री सई ताम्हणकर! फॅशन असो वा अभिनय सई कायम तिच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतेय आणि पुन्हा एकदा सई नव्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे

सईने या ओव्हरकोट लूक मधून बॉस लेडी लुक क्रिएट केला आहे. नेहमी विविधांगी भूमिका साकारणारी सई ताम्हणकर नेटफ्लिक्सच्या 'डब्बा कार्टेल'मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत असून ती पोलीस निरिक्षक प्रीती जाधव ही भूमिका साकारताना दिसणार आहे

बॉलिवूडमध्येदेखील सईने तिच्या अभिनयातील वेगळेपणा जपत सातत्यपूर्ण काम सुरूच ठेवलं आहे आणि येणाऱ्या काळात देखील ती अनेक बड्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग होणार असल्याच कळतंय

सईने यावेळी संपूर्ण कॉर्पोरेट लुक ठेवला असून तिने चेक्सच्या फॅशनचा वापर केलाय. ओव्हरकोट लुकमध्ये सई खूपच डॅशिंग आणि आकर्षक दिसत आहे. तिचा हा लुक काही वेळातच व्हायरल झालाय

यासह सईने केस मोकळे सोडून आपल्या ओव्हरकोटमध्ये फोल्ड केले आहेत. तिची ही स्टाईल तिच्या व्यक्तीमत्वाला अधिक उठाव आणत असून तुम्हीही एखाद्या मीटिंगसाठी असा लुक करू शकता

या कॉर्पोरेट लुकसाठी सईने मॅट मेकेअप केला असून फाऊंडेशन बेस, काजळ, मस्कारा, ब्राऊन आयशॅडो, हायलायटर आणि ग्लॉसी लिपस्टिकचा वापर केलाय. यामध्ये सई खूपच सुंदर आणि लक्षवेधी दिसतेय

दरम्यान हा लुक पूर्ण करताना तिने ब्लॅक हाय हिल्स परिधान केले आहेत आणि कॉर्पोरेट लुकला एक वेगळीच उंची दिली आहे. सईच्या अदा पाहून नेटकरी संपूर्णतः तिच्या लुकवर फिदा झाल्याचे नेटवर दिसतेय






