'काही दिया परदेस' या मालिकेतून महाराष्ट्रभरात पोहचलेली अभिनेत्री सायली संजीव तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. ३१ जानेवारी, १९९३ रोजी सायलीचा जन्म झाला होता. मॉडेलम्हणून सुरु केलेला सिनेसृष्टीतील प्रवास आज अभिनेत्री म्हणून सुरु आहे. तसेच सायली अनेक मराठी तरुणांची क्रश म्हणून देखील ओळखली जाते.
अभिनेत्री सायली संजीवचा वाढदिवस दणक्यात साजरा. (फोटो सौजन्य - Social Media)
'काहे दिया परदेस' या मालिकेत अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली होती. तिने गौरी ही भूमिका साकारलेली आणि संपूर्ण महाराष्ट्र स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे.
आज (३१ जानेवारी, २०२५) सायली संजीवचा वाढदिवस असून अभिनेत्रीला सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.
एका मालिकेतून सुरु झालेला सायलीचा प्रवास आता चित्रपटसृष्टीपर्यंत आला आहे. 'सातारचा सलमान', 'बस्ता' या सिनेम्यातून अभिनेत्रीने उत्तम परफॉर्मन्स दिला आहे.
मुळात, सायलीने 'पोलीस लाईन' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. या सिनेमातून सायली पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती.
'आठवते का तुला' या Album मधून मॉडेल म्हणून सुरुवात करत अभिनेत्रीने इथपर्यंतचा सफर गाठला आहे. तिच्या या आनंदाच्या दिवशी तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत, तिच्या भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा!