एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील कलाकार आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी मंदिरात लग्न केले आहे. दोघांनीही आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आनंदाची बातमी दिली आहे. चित्रपटसृष्टीशी निगडित दोन स्टार्सनी एकमेकांचा हात धरून ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. वास्तविक, आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ बराच काळ एकमेकांसोबत होते. आता या जोडप्याने लग्न केले आहे. दोघांच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक उपस्थित होते. आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते दोघांचे अभिनंदन करत आहेत. आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकले आहेत. पाहुयात या पोडप्यांचे फोटोज (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने ४०० वर्ष जुन्या मंदिरात लग्न केले आहे. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर येताच चाहते खूप खुश झाले आहेत.
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी त्यांच्या लग्नाचा अल्बम सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी फोटोंसोबत लिहिले, 'तुम्ही माझा सूर्य, चंद्र आणि माझे सर्व तारे आहात... अनंत काळासाठी सोबत राहा... हसण्यासाठी, शाश्वत प्रेमासाठी, प्रकाश आणि जादूसाठी ... सौ. अदू-साधू.' असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.
अदिती राव हैदरीने लग्नात पारंपारिक दक्षिण भारतीय लेहेंगा परिधान केला होता. त्याचवेळी सिद्धार्थने लग्नात धोती-कुर्ता परिधान केला होता. दोघांचाही पोशाख खूप सुंदर आणि आकर्षित दिसत होता.
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आता आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने त्यांच्या नात्याला एक नाव दिले आहे. अदिती आणि सिद्धार्थने आधीच साखरपुढा केला होता. या दोघांच्या एंगेजमेंटनंतर चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ अनेकदा त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. परंतु या जोडप्याचे चाहते त्याच्या लग्नाच्या छायाचित्रांची वाट पाहत होते आणि आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.