आपल्या सर्वांचेच बँकेत सेव्हिंग अकाऊंट असते ज्यात आपण कष्टाने कमावलेले पैसे सेव्ह करून ठेवतो. आता तुम्हाला माहिती आहे का? बँकेतील एका सर्व्हिसनुसार तुम्ही तुमचे पैसे तीन पटींनी वाढवू शकता. अनेकांना याबाबत माहिती नाही ज्यामुळे लोक आपले नुकसान करून घेतात. अशात तुम्ही आजच ही सर्व्हीस ॲक्टिव्हेट करा आणि या संधीचा लाभ घ्यायला सुरुवात करा. (फोटो सौजन्य: Pinterest, istock)
अनेकांना ठाऊक नाही ही ट्रिक, ही सर्व्हिस ॲक्टिव्हेट करून बँकेतील Saving Account वर मिळवता येईल तिप्पट व्याज
आपल्या बँकेतील अकाऊंटवर एक सर्व्हिस सुरु करून तुम्ही आर्थिक लाभ मिळवू शकता. ही सुविधा म्हणजे ऑटो स्वीप सर्विस (Auto Sweep Service). या सर्व्हिसबाबत अनेकांना माहिती नसते मात्र यातून तिपटीने व्याज मिळवता येते
अकाऊंट होल्डर्सना ऑटो स्वीप सर्विसच्या मदतीने सरप्लस फंडवर अधिक व्याज मिळवणे शक्य होते. या सेवेअंतर्गत तुमच्या Saving Account मध्ये असणाऱ्या रकमेहून अधिक रक्कम जमा झाल्यास सरप्लस फंडच्या स्थितीमध्ये Automatically ही रक्कम FD मध्ये ट्रान्सफर केली जाते, ज्यामुळे तुम्हाला एफडीवर मिळणारे व्याज चालू होते
उदाहरणार्थ , जर तुमच्या बँक अकाऊंटची लिमिट 30,000 रुपये असेल आणि अकाऊंटमध्ये 60,000 रुपये भरण्यात आले असतील. तर, 30,000 रुपयांहून अधिकची रक्कम म्हणजेच जास्तीचे 30 हजार रुपये एफडीमध्ये रुपांतरित केले जातील ज्यावर तुम्हाला व्याज लागू होईल
बँकेमध्ये जाऊन तुम्ही ही सर्व्हिस तुमच्या अकाऊंटवर सुरु करू शकता. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अकाऊंटमधील जमा रकमेवर जास्तीत जास्त फायदा मिळाल्यामुळे अकाऊंट होल्डर सेविंगसाठी अधिक प्रेरित होतात
ऑटो स्वीप सर्विसमध्ये तुम्हाला मॅन्युअली रक्कम एफडीमध्ये ट्रान्सफर करावी लागत नाही तर ही संपूर्ण प्रक्रिया ऑटोमॅटिक टेक्निकने आपोआप सुरु राहते आणि यावर वाढीव व्याजदराचा फायदासुद्धा घेता येतो