इंडियन प्रीमियर लीग 2024 चा फायनलचा सामना काल पार पडला. या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट राइडर्सने सनरायझर्स हैदरबाच्या संघाचा 8 विकेट्सने पराभव केला. कालच्या विजयानंतर कोलकाता नाइट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून आयपीएल विजेतेपदाचा 10 वर्षांचा दुष्काळ संपवला. त्याचवेळी, या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंव्यतिरिक्त चाहत्यांनी आणि शाहरुख खानने त्याच्या कुटुंबासह जल्लोष साजरा केला.
यंदाच्या सिझनला शाहरुख त्याचा संघाचे प्रत्येक सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिला आणि संघाला दिलासा दिला. यंदाच्या सीझनमध्ये त्याच्या संघाने दमदार कामगिरी करत अव्वल स्थानावर कायम राहिला.
कालचा फायनलचा सामना संपल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान त्याचबरोबर त्याच्या परिवाराच्या भावना कॅमेरात कैद झाल्या.
चॅम्पियन बनल्यानंतर शाहरुख खानने मुलगी सुहाना खानला मिठी मारली. यावेळी दोघेही खूप भावूक दिसले. शाहरुख खान व्यतिरिक्त सुहाना खान आणि मुलगा अबराम विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न दिसले.
शाहरुख खान, सुहाना खान आणि मुलगा अबराम यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर कालच्या सामन्यांमध्ये शाहरुखसोबत जुई चावला सुद्धा सोबत दिसली.
कोलकाता नाईट राइडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली यंदाच्या सीझनमध्ये संघाने दमदार कामगिरी करून चॅम्पियन झाले. त्याचबरोबर संघामध्ये हेड कोच म्हणून गौतम गंभीरचे सुद्धा पुनरागमन झाले.